वादग्रस्त पोस्ट वादग्रस्त विधाने. विघातक परिस्थिती निर्माण करतात.

सामाजिक

प्रतिनिधी

समाजकंटक हा कोणत्याही धर्माचा जातीचा नसतो. घरामध्ये किंवा जगाच्या पाठीवर कुठल्याही कानाकोपऱ्यात बसून. समाजामध्ये दुफळी निर्माण होईल या प्रकारची वादग्रस्त विधाने वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर टाकून मोकळा होतो. आणि मग त्यावर लाईक फॉलो क्रिया प्रतिक्रिया. ही समाज माध्यमाची परावलीचे समाज मनाचे खोटे मोजमाप करणारे सोशल मीडियाचे स्तुती पाठक शब्द लोकांना क्षणातच एकत्र करतात. आणि लोकही मागचा पुढचा विचार न करता त्यामध्ये सामील होतात अशातूनच शुल्लक कारणातून जमाव तयार होतो. आणि जमावाची व्याख्या अशी आहे तो जर बेकाबू झाला तर त्याला विचार आचार काही राहत नाही. आणि मग समाजामध्ये विध्वंसक परिस्थिती निर्माण होते. यामध्ये नुकसान  समाजाचं होतं.

आपला महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकर यांना मानणार आहे. यातील कोणताही समाज सुधारक ज्या जातीमध्ये जन्माला आला त्या जातीच फक्त भलं करण्यासाठी कार्य केलं नाही तर तमाम संपूर्ण समाजाचं भलं व्हावं यासाठी त्यांनी कार्य केलेला आहे. कोणत्याही समाजसुधारकाला एका ठराविक जातीचे लेबल लावणं हा समाज करंटेपणा आहे. त्यांचे विचार कधीच आपल्याला धर्मांत होऊ देत नाहीत.

लाईक्स फॉलो च्या जमान्यांमध्ये जर समाजासाठी कामच करायचे आहे तर सोशल मीडियावर प्रतिक्रिया देऊ नका समाजामध्ये जर तुम्ही स्वतःच्या जीवाची परवा न करता काही करणारच असाल तर अन्याय होणाऱ्या विरुद्ध लोकशाही मार्गाने आवाज उठवा पोलीस ठाण्यामध्ये जर लोकांना पंच म्हणून हजर राहण्यास सांगितलं तरीसुद्धा कोणी समोर येत नाहीत परंतु एखाद्या गोष्टीवर सोशल मीडियावर प्रतिक्रिया देण्यासाठी हजारो लोक तात्काळ कॉमेंट्स लिहितात. सार्वजनिक सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपण पोलिसांना तपासात सहकार्य करा असे सांगितले तर प्रतिक्रिया देणारे म्हणतात आम्हाला कशाला या भानगडीत पाडता मग हे खरोखर शूरवीर आहेत का. गौतम बुद्ध नेहमी सांगायचे आग लावणे सोपे असते परंतु आग विझवणे खूप अवघड असते. आग विझवणे किती अवघड आहे हे एकदा प्रत्येकाने आजमावून पहा. मग आग लावण्याचे धाडस कोणी करणार नाही. प्रत्येक व्यक्तीला धर्म असतो धर्म हा कोणताही असला तरी तो आचार विचार शिकवतो मनुष्याला रानटी अवस्थेतून सुसंस्कृत अवस्थेत आणण्याचे काम धर्मांनी केलेला आहे. कोणताही धर्म कोणत्याही दुसऱ्या धर्मावर आक्रमण करा याची शिकवण देत नाही. परंतु धर्मांध लोक हे विकारी प्रचार करून दुसरा धर्म कसा विरोधात आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून प्रत्येकाने आपल्या धर्मात सांगितलेले सहिष्णुतेचे तत्व याचे पालन केले पाहिजे.

समाजकंटक स्वार्थासाठी धर्माची ढाल करतात व स्वतःची पोळी भाजून घेतात म्हणून सर्वांनी सावध असले पाहिजे.

म्हणून माझी सर्व बारामतीकरांना विनंती आहे आजूबाजूला ज्या घटना घडतात त्यावरून आपल्यातील भाईचारा कमी होईल अशी कोणतीही गोष्ट करू नका वादग्रस्त पोस्ट विधाने सर्वांनी टाळावेत अन्यथा निष्कारण कायदेशीर कारवाई करणे भाग पडते