मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

निंबूत विद्यालयात योग दिन साजरा

mnewsmarathi 21 Jun 2023 1 मिनिट वाचन 9,575 वाचन

प्रतिनिधि

श्री. बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालय निंबुत विद्यालयात २१ जून २०२३ रोजी सकाळी ठीक ९:००वाजता आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला .

आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून विद्यालयामध्ये मुख्याध्यापिका सौ. दिपाली ननावरे यांनी योग दिनाविषयी माहिती सांगितली, विद्यार्थ्यांचे उद्बोधन केले .वाढत्या वयामध्ये विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक विकास होण्यासाठी योगासने अतिशय महत्त्वाची असतात , यावर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले , श्री. कोळेकर पी. एस . यांनी प्रात्यक्षिके करून दाखवली.

विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी योग दिनानिमित्त विविध योगासने केली त्याचप्रमाणे प्राणायाम कृती व मार्गदर्शन करण्यात आले .संस्थेचे अध्यक्ष श्री.सतीशभैय्या काकडे देशमुख संस्थेचे उपाध्यक्ष श्री.भीमराव बनसोडे सर , संस्थेचे मानद सचिव श्री.मदनराव काकडे यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. .

लेखक

mnewsmarathi

M News Marathi