• Home
  • सामाजिक
  • सामान्य नागरिक पत्रकार सामाजिक कार्यकर्ते राजकीय पार्टीचे पदाधिकारी यांना पोलीस स्टेशनमध्ये सन्मानाची वागणूक देण्याची भारतीय युवा पँथर संघटनेची मागणी
Image

सामान्य नागरिक पत्रकार सामाजिक कार्यकर्ते राजकीय पार्टीचे पदाधिकारी यांना पोलीस स्टेशनमध्ये सन्मानाची वागणूक देण्याची भारतीय युवा पँथर संघटनेची मागणी

प्रतिनिधी

बारामती : भारतीय युवा पॅंथर संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज अप्पर पोलीस अधीक्षक बारामती यांच्याकडे निवेदन देऊन सामान्य नागरिक पत्रकार सामाजिक कार्यकर्ते राजकीय पार्टीचे पदाधिकारी यांना पोलीस स्टेशनमध्ये सन्मानाची वागणूक द्या अशी मागणी केली आहे.

पत्रकार सामाजिक कार्यकर्ते राजकीय पार्टीचे पदाधिकारी स्वतःच्या खाजगी कामासाठी पोलीस स्टेशनला येत नसतात त्यांच्याकडे नागरिक मदत मागण्यासाठी गेले असता त्या व्यक्तीला पोलीस स्टेशनची मदत हवी असल्यास त्याच्यासोबत पोलीस स्टेशनला जात असतात त्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर पत्रकार सामाजिक कार्यकर्ते यांना सन्मानाची वागणूक मिळत नाही त्यांना सन्मानाची वागणूक देणे गरजेचे आहे.कारण पीडित व्यक्ती व पोलीस यांच्यातील दुवा म्हणून त्या व्यक्ती काम करत असतात.

बऱ्याच वेळा पोलीस स्टेशनला कामानिमित्त जावे लागते त्यावेळेस आलेल्या अनुभवावरून शुभम गायकवाड यांनी माननीय अप्पर पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन विनंती केली होती की पोलीस स्टेशनला येणाऱ्या सामान्य नागरिक सामाजिक कार्यकर्ते पत्रकारांना सन्मानाची वागणूक देण्याचे आदेश बारामती तालुक्यातील व बारामती शहर पोलीस स्टेशनला द्यावेत.

पोलिसांबद्दल नागरिकांमध्ये एक आदराची, सन्मानाची जागा असते कोणावरही अन्याय झाला की प्रथम न्याय मिळवण्यासाठी कोणतीही व्यक्ती पोलीस स्टेशनला जात असते. पण यावेळी त्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी त्या पीडित व्यक्तीला न्याय मिळवून दिला किंवा न्याय मिळवून देण्यासाठी देण्यासाठी मदत केली तर पोलिसांबद्दल लोकांमध्ये आणखी आदराची भावना निर्माण होईल.

सदर निवेदनाची दखल घेऊन तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांनी दिले.

यावेळी भारतीय युवा पँथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे, संपर्कप्रमुख शुभम गायकवाड, सरचिटणीस गणेश थोरात, बारामती तालुका महिला अध्यक्ष वंदना गायकवाड, बारामती शहराध्यक्ष निखील भाई खरात, बारामती शहर संघटक समीर खान, सदस्य नितीन (दादा)गायकवाड,अरुण मोरे उपस्थित होते.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनतर्फे पत्रकार दिनाच्या पत्रकारांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा.

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून सर्व पत्रकार बांधवांचा…

ByBymnewsmarathi Jan 6, 2026

बारामती बिबट्या संदर्भातील चुकीच्या बातमीबाबत स्पष्टीकरण व जाहीर माफी.

आमच्या ‘एम न्यूज मराठी’ (M News Marathi) या न्यूज पोर्टलवर काल, दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी बारामती परिसरात…

ByBymnewsmarathi Dec 24, 2025

भीमाशंकर मंदिर ३ महिने बंद ठेवण्याबाबत प्रशासकीय चर्चा; लवकरच होणार अंतिम निर्णय

प्रतिनिधी बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर २८८.१७ कोटींचा विकास…

ByBymnewsmarathi Dec 24, 2025

गोमाता’ फक्त भाषणातच का? रस्त्यावर फेकल्या जाणाऱ्या वासरांच्या नशिबी मरणयातनाच!

सह संपादक- अक्षय थोरात ​ ​आपण गायीला ‘माता’ मानतो, तिची पूजा करतो. पण आज समाजातील एक भयाण वास्तव…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025