प्रतिनिधी
निरा ते बारामती टू व्हीलर वरती प्रवासात भरपूर वाढ होत आहे. तालुक्याच्या ठिकाणी जायचे म्हणले तर टू व्हीलर चा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. रात्री अपरात्री टू व्हीलर वरती जात असताना मोकाट भटक्या कुत्र्यांचा सामना करावा लागत आहे या भटक्या कुत्र्यामुळे भरपूर अपघात झालेले आहेत.
माणूस आणि कुत्रा पूर्वीपासूनच एकत्र राहिले आहेत कुत्रा आणि माणसाचं नातं जिव्हाळ्याचा आहे पण भटक्या फिरणारी कुत्री यांचा विषयी जरा अवघड होऊन बसला आहे. अन्नाच्या शोधात स्थलांतर करावे लागत आहे.
गाडीचे वाजणारे हॉर्न , गाडी लाईट मुळे डोळे चमकतात या त्रासामुळे सुद्धा ही कुत्री आक्रमक होत असावीत ?
ही भटकी कुत्री दबी धरुन रस्त्याकडेला बसतात आणि अचानक टू व्हीलर वरती हल्ला करताना दिसत आहेत. हल्ला झाल्यावर गाडी चालक तसेच पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीला खूप मोठे दुखापतीचा सामना करावा लागत आहे. कमरेला मुका मार लागणे पाय फ्रॅक्चर होणे डोक्याला लागून मोठ्या दुखापतींचा सामना करावा लागत आहे.
भटक्या कुत्र्यांना आळा बसेल का?
भटका कुत्रा अचानक चाकात येणे किंवा अचानक गाडीवर हल्ला करणे यामुळे सर्व सामान्याला या अपघातांमुळे अति वेदना होत असल्याने तसेच खर्च दवाखान्याचा न परवडणारा असा विषय होऊन बसला आहे.
कोणाच्या पायाचे हाड मोडत आहे तर कोणाच्या हाताचे हाड या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात कधी कोणाला कुठे लागेल याचा भरोसा नाही.
पावसाची रिमझिम झाल्यावर चिखलात न थांबता ही भटकी कुत्री व एकोप्याने रस्त्यावर उतरत असताना दिसत आहेत. या कुत्र्यामुळेच जास्त अपघाताचे प्रमाणात वाढ होत असताना दिसत आहे?
भटक्या कुत्र्यांच्या वर आळा घालने कोणाचे काम आहे? भटक्या कुत्र्यावर आळ घालणारी संबंधित वर्ग का लक्ष देत नाही ?
भटक्या कुत्र्यापासून सुटका होईल का? अशी चर्चा निरा ते बारामती तसेच खेडोपाड्यात चर्चा होत असताना दिसत आहे .
भटक्या कुत्र्यावर आळा घालणारे संबंधित प्रशासन , संबंधित अधिकारी तसेच कार्यकारी वर्ग याकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन भटक्या कुत्र्यांना आळा घालावा व अपघातापासून सुटका व्हावी असे प्रत्येकाचे मत तयार होत असताना दिसत आहे