पालेभाज्याच्या वाढत्या दरामुळे सर्वत्र एकच चर्चा आहे की डब्यात द्यायचे काय …??

सामाजिक

प्रतिनिधी

सध्या बाजारांमध्ये फळे भाजी यांची किंमत अफाट वाढल्यामुळे सामान्य नागरिक चिंतेत जगत आहे परंतु जेव्हा फळे भाज्यांची किंमत कमी होते आणि शेतकऱ्यांना नुकसान होते त्यावेळेस सामान्य नागरिक शेतकऱ्यांची चिंता का करत नाही?

सामान्य नागरिका मॉल मध्ये गेल्यानंतर किंवा हॉटेलमध्ये गेल्यानंतर म्हणेल तेवढे पैसे खर्च करण्यास तयार होतो परंतु शेतकऱ्याकडून पालेभाजी घेण्यास मोल भाव करत असतो असा भेदभाव का?

पालेभाज्याची कीमत वाढल्यामुळे साध्या सर्वत्र एकच चर्चा आहे की डब्यात काय द्यायचे…??

यावर एक शेतकर्‍यांने लिहलेला लेख आम्ही प्रकाशित करत आहोत. हा लेख कोणाचा आहे माहीत नाही परंतु या शेतकर्‍यांने जे लिहले ते कटू सत्य आहे, पण समाज याला मान्य करणार नाही .

लेख खालील प्रमाणे

मॅडम….जरा शेतावर जाऊन फेरफटका मारून या…मग कळेल…डब्यात काय द्यायचे…??

तुमचे पती जरी दारू पीत नसेल…पण कित्येकींचे नवरे….160 ते 250 रूपयाची फक्त 180 ml दारूची कॉर्टर घेऊन.. 20 रुपयाचा चकणा अन् 20 रूपयाची पाणी बॉटल घेऊन पीत बसतात … तेव्हा नाही कळत डब्यात काय द्यायचे….??

         तुम्ही महिन्यात 500 ते 1000 रूपयाची नखपॉलिश , व इतर मेकअपचे सामान खरेदी करतात तेव्हा नाही कळत डब्यात काय द्यायचे….??

      जे कि तुमच्या नवऱ्यांने व सासरच्यांनी तुम्हाला जशा असेल तसे स्विकारले असताना हि…हा मेकअप …कुणासाठी करून खर्च करून वाढवतात… तेव्हा नाही कळत डब्यात काय द्यायचे….??

       मातीत काम करायला लागेल म्हणुन तुम्ही शेतकरी नवरा नाकारून …नोकरीवाला नवरा करताना हे नाही कळाले….पगार संपला तर…. डब्यात काय द्यायचे….

      शेतकऱ्यांच्या पिकांना द्यावी लागणाऱ्या खतांची भाव वाढले….तेव्हा उतरल्या तुम्ही रस्त्यावर….??

    गृहिणींनो आता कांदे स्वस्त आहेत….त्यांचीच चटणीच करा…अन् द्या डब्याला…भजे तळा द्या डब्याला….

               30 रु ते 40 रूपये किलो शेतकरी हरभारे विकतात… त्याची चनाडाळ 80 ते 90 रूपये किलो ने खातात…तेव्हा तुमची बुध्दी ..पार्लर मध्ये जाते मेकअप करायला…

      30 ते 40 रुपये किलो ने विकलेल्या तुरी…. त्यापासुन बनवलेल्या दाळीला 110 ते 120 रु किलो ने खरेदी करतात….तेव्हा ही तुमची बुध्दी…मेकअप करायला जाते….कमालच आहेत तुमच्या बुध्दीची….

      शेतकऱ्याच्या बायका…. कमी पैशात ही कश्या जगतात हे जरा बघा….. मग बजेट बघा…..

   ढगांतुन पाऊस नाही…. विहीरी कोरड्या ठाक पडल्यात… तर पिके उभे कसे राहतील… एवढी तसुभरही आक्कल नसावी…… पत्रकार बावळट झाला…म्हणुन काय तुम्ही ही….उठुन काही ही बोलावे….हे जरा पटण्यासारखे नाहीत……

गृहिणीनों समजदार असुनही….असल्या बावळट पत्रकारांच्या नादी लागुन ….. शेती अन् शेतकऱ्यावर बोलत सुटू नका….. परिस्थिती पहा… वेळ पहा…व मनाला विचारा…..जेव्हा शेतकरी फुकट वाटतो तेव्हा तुम्ही….गुलक्या मारून खातात….मजा मारून खातात….तेव्हा त्या रात्री शेतकऱ्यांचे घर उपाशी झोपलेले असते…. याचे हि भान ठेवावे….🙏🙏