प्रतिनिधी
वाघोली ता.हवेली ता.१२ येथील डॉ.गजानन डी.जाधव यांना नुकताच कोल्हापूर येथे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती दूत पुरस्कार मोठ्या उत्साहाने प्रदान करण्यात आला आहे.
सदरचा पुरस्कार सोहळा “समर्थ सोशल फाऊंडेशन व न्युट्रिफिल हेल्थ प्रा. ली”. या ट्रस्ट कोल्हापूर च्या माध्यमांतून देण्यात आला.
डॉ.गजानन देवचंद जाधव हे सन २००० पासुन निसर्गोपचार पद्धतीने व आयुर्वेदिक पद्धतीने
तळेगाव ता.जामनेर जि. जळगाव (खान्देश) ह.मु.वाघोली पुणे
व्यसनमुक्ती – दारु सोडवा नं. सांगता नं.आणता घर बसल्या संपूर्ण महाराष्ट्रात कार्य करत असून २०२२ पासुन वाघोली पुणे येथे व्यसनमुक्ती मधुमेहमुक्त (शुगर डायबिटीस) वर उल्लेखनीय कामगिरी करुन आणि कुटुंबीयांना नवसंजीवनी देऊन समाजात आर्दश निर्माण करणाऱ्या व सामाजिक धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल
.व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्त मध्ये २०२३ चा भव्य महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यांनी अनेक पुरुष व महिला यांना हजारो लोकांना व्यसनमुक्त व मधुमेह मुक्त केल्या बद्दल त्यांच्या कांमाची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला .
हा पुरस्कार आनंदा शिंदे, जिल्हा समन्वयक महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांचे हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. गजानन जाधव यांच्यावर जळगाव व पुणे जिल्ह्यातील विविध सामाजिक, राजकीय , डॉक्टर, पत्रकार, वकील, इंजिनियर, शिक्षक इत्यादी मान्यवराकडून शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी नारायण पोवार, PNB मेट लाईफ इन्शरन्स ब्रांच मॅनेजर, व लोकसभा उमेदवार, स्वामी वासुदेवानंद गिरी मध्यप्रदेश बृहांनपुर, कराड तालुक्याचे नायब तहसीलदार विजय माने, समर्थ सोशल फाऊंडेशन चे संस्था अध्यक्ष सादिक शेख साहेब, शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्र संस्थापक सागर देसाई, डॉ.हरिदास भोसले हे उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्था संचालक सुहास पाटील सर, यांनी केले व सूत्रसंचलन अस्लम शेख यांनी केले. यावेळी दिडशे डॉ. व नॉन डॉक्टर यांना पुरस्कारं देऊन त्यांच्या कामाचे कौतुक करण्यात आले. यावेळी वरील उपस्थित मान्यवरांनी आपले मोलिक विचार मांडले. आपला भारत देश डायबेटिस कंट्री होत आहे. अश्यावेळी भारत व्यसनमुक्त व मधुमेह मुक्त करणे काळाची गरज असल्याचे सांगितले. अश्या वेळी समर्थ सोशल फाऊंडेशन माध्यमातून डॉ.गजानन जाधव चे कार्य कौतुकास्पद असून त्यांचें कार्य वाढत जावे या साठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.