प्रतिनिधी.
रोहित बनकर यांनी आपल्या उपाध्यक्ष पदाचा राजिनामा ओबीसी विभाग प्रदेश कार्यालयाकडे पाठवला होता परंतू सदर राजिनामा बाबत ओबीसी विभाग प्रदेश अध्यक्ष श्री.भानुदासजी माळी साहेब यांनी प्रांताध्यक्ष आ. श्री.नानाभाऊ पटोले यांच्याशी चर्चा केली.आपण बारामती सारख्या शहरात उत्तम प्रकारे काँग्रेस पक्षाचे काम करीत आहात त्या कामाची दखल घेऊन प्रांताध्यक्ष आ.श्री.नानाभाऊ पटोले यांनी राजिनामा नामंजूर करण्यात यावा असे आदेश श्री.भानुदासजी माळी साहेब यांना दिले.नानाभाऊ पटोले यांनी दिलेल्या आदेशाची श्री.भानुदासजी माळी साहेब यांनी अंमलबजावणी केली असून आपला राजिनामा नामंजूर करण्यात येत आहे याची नोंद घेऊन आपण पुन्हा एकदा ओबीसींना न्याय देण्यासाठी व काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्याकरिता पुन्हा एकदा जोमाने काम कराल असे आदेश काँग्रेस पक्षाकडून रोहित बनकर यांना देण्यात आलेले आहेत.
काल अचानक रोहित बनकर यांनी राजीनामा दिल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील रोहित बनकर यांना अध्यक्ष आपली गरज बारामती तालुक्याला खूप आहे कृपया आपण राजीनामा देऊ नये अशा अनेक चर्चा व्हाट्सअप च्या माध्यमातून चालू होत्या. रोहित बनकर पुन्हा एकदा अध्यक्षपदाची धुरा सांभाळणार की आपल्या राजीनामेवरतीच ठाम राहणार याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून राहिलेले आहे.