प्रतिनिधी
करंजेपूल गावचे हिंदवी उधोग समूहाचे सर्वेसर्वा मा.श्री राजेंद्र गायकवाङ यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. जि.प.प्राथमिक शाळा करंजेपूल येथे वृक्षारोपण तसेच प्राथमिक शाळेतील विद्यार्थी यांना शालेय साहित्य वही पेन खाऊ वाटप करून साजरा करण्यात आला.
या प्रसंगी सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषीकेश गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.शाळेतील विध्यार्थी व शाळेच्या अङचणी जानून घेतल्या.शाळेच्या अङचणी सोडवण्याचा प्रयत्न व मदत केली जाईल.
तसेच सर्वानी वाढदिवस साजरे करताना समाजिक उपक्रम राबवावेत आशी मनोकामना व्यक्त केली.या कार्यक्रमास सूर्यकांतनाना गायकवाड, राजेंद्र गायकवाङ,सागर गायकवाड, विनोद गायकवाड, बच्चू गायकवाड, सुशांत सोरटे, शिवाजीराव शेंङकर, महेंद्र शेंङकर, भा.ज.पाटीॅचे नेते इंद्रजित भोसले, तसेच शालेय शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.कार्यक्रमाचे स्वागत व आभार कोळेकर गुरूजी यांनी मानले.