मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Friday, 21 August 2026
|
महाराष्ट्र: ...
बाजार: SENSEX 81,100 ▲ NIFTY 24,800 ▲
M NEWS MARATHI

अन्याया विरुद्ध आवाज उठवणारा एकमेव चॅनल

राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम – पुणे जिल्हा युवक उपाध्यक्ष अमोल साबळे

mnewsmarathi प्रतिनिधी
July 23, 2023 1 मिनिटांचे वाचन 5002 वेळा पाहिले

प्रतिनिधी

नीरा ता.पुरंदर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाचा वर्धापनदिन आणि राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त भीम सामाजिक विकास प्रतिष्ठान (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने

सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.याबाबतची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) या पक्षाचे पुणे जिल्हा युवक उपाध्यक्ष अमोल साबळे यांनी दिली.

गुरूवार दिनांक २७ जुलै रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप,वृक्षलागवड,

अन्नदान,ग्रामपंचायत कर्मचारी महिलांना साडी वाटप,

तसेच रुग्णांना फळे वाटप आदी महत्त्वपूर्ण कार्यक्रम संपन्न करण्यात येणार आहे.यावेळी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित असणार आहेत.राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वत्र विविध उपक्रम घेतले जात असतात.अमोल साबळे यांच्या कडून ही दरवर्षी

विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करताना एक सामाजिक बांधिलकी जपली जात असते.वर्षभरात विविध उपक्रमशील कार्यक्रम ही घेतले जात असतात.

पक्षाचा वर्धापनदिन आणि राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांचा वाढदिवस सामाजिक हित लक्षात घेऊनच हे दोन्ही कार्यक्रम घेण्याचा मानस अमोल साबळे यांचा असतो.नीरा शहरातुनच नव्हे तर पुरंदर तालुक्यातून अमोल साबळे यांनी सामाजिक कार्यात एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे.समाजाचे आपण काहीतरी देणे लागते.त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाप्रति काम करणे ही आपली जबाबदारी असल्याचे अमोल साबळे यांनी म्हटलेले असून अमोल साबळे यांच्या कार्याबद्दल सुद्धा समाजातून चांगली भावना व्यक्त केली जात असते.दीपकभाऊ निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजहिताचे असेच कार्य करत राहणार असल्याचे अमोल साबळे यांनी म्हटलेले असून या उपक्रमास सर्वांनीच उपस्थित राहण्याचे आवाहन केलेले आहे.

mnewsmarathi

हे लेखक M NEWS MARATHI साठी उत्कृष्ट पत्रकारिता करत आहेत.

सर्व लेख पहा