मा.उपमुख्यमंत्री अजितदादा- पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हनुमान नगर महिला बचत गट ग्रुप आयोजित 23 जुलै रोजी भव्य आरोग्य शिबिर.

माझा जिल्हा

प्रतिनिधी

 कृषी सहाय्य सुप्रियाताई पवार यांच्या हस्ते फित कापून शिबिरास सुरुवात केली महिलांची बी पी, शुगर, हिमोग्लोबिन ,तपासणी करण्यात आली काही आरोग्याच्या तक्रारी निरसन डॉक्टरांनी केले योग्य मार्गदर्शन महिलांना मिळाले. 2020 मध्ये महिलांच्या आरोग्य तपासणीला सुरुवात केली. आज समाधानकारक रिजल्ट मिळाला पहिल्या वर्षी 80 टक्के महिलांचे “एच बी “चे प्रमाण कमी होते आज ते प्रमाण वाढले असून अख्या शिबिरात फक्त तीन महिला अशा सापडल्या की त्यांचे हिमोग्लोबिन प्रमाण कमी आहे प्रत्येक वर्षी शिबिर आयोजित केले ज्या महिलांचे ज.या महिलाचे हिमोग्लोबिन कमी आहे त्यांची वेगळी लिस्ट केली जाते.

यांना तीन महिने रक्त वाढीच्या गोळ्या घरपोच केल्या जातात आणि आवर्जून कुटुंबात हे सांगितलं जातं होते. त्यांचे काळजी घेण्यास. हर्षदा सातव आणि अर्चना सातव आम्ही ही जबाबदारी पार पाडत होतो. आज शिबिराचा रिझल्ट पाहून हे आरोग्य शिबीरास मिळालेले यश आहे असे वाटते. या शिबिरास सहकार्य करणाऱ्या प्रत्येक सहकार्याचे यश आहे.

आरोग्य शिबिरास प्रमुख उपस्थिती मा. नगराध्यक्ष जयश्री भाभी सातव. कृषी अधिकारी सुप्रियाताई बांदल बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन दादा सातव, कृषी सहाय्यक सुप्रियाताई पवार सामाजिक कार्यकर्ते महादेव आदलिंगे.

हे शिबिर यशस्वी होण्यासाठी विशेष सहकार्य डॉक्टर महेश जगताप, डॉ नाजिरकर ,डॉ. सुनील पवार..

*- शिबिरास उपस्थित सर्व डॉक्टर्स सिस्टर्स आशा वर्कर आणि सर्व बचत गट सदस्य आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार..🙏🙏*-

बचत गट ग्रुपच्या वतीने सर्व आरोग्य टीमचा सन्मान करण्यात आला..

अध्यक्षा अर्चना सातव. यांनी प्रस्तावना केली उपाध्यक्ष हर्षदा सातव निता आवडे यांनी

 सर्वांचे आभार मानले…🙏🙏