मुख्य मजकुरावर जा
Saturday, 19 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 11 August 2024 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपाकरीता ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
August 11, 2024 1 मिनिट वाचन 8,515 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी

कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपाचा पुरवठा करण्यात येणार असून याकरीता महाडीबीटी संकेतस्थळावर १४ ऑगस्ट २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत.

राज्य पुरस्कृत एकात्मिक कापुस सोयाबिन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मुल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पंपाचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login

या संकेतस्थळावर अर्ज करावेत.  पुणे जिल्ह्यासाठी ६६० पंपांचा लक्ष्यांक निर्धारित करण्यात आला आहे. महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जातून लाभार्थ्यांची निवड ऑनलाईन पध्दतीनेच करण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन पुणे जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख