मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

भारतीय पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा सचिव पदी काशिनाथ पिंगळे यांची निवड 

mnewsmarathi 27 Jul 2023 1 मिनिट वाचन 8,828 वाचन

प्रतिनिधि

भारतीय पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा सचिव पदी काशिनाथ पिंगळे यांची नुकतीच निवड करण्यात आली.

 मुढाळे येथे भारतीय पत्रकार संघ बारामती तालुका मासिक बैठक नुकतीच घेण्यात आली.

 या बैठकीला उपस्थित असलेले भारतीय पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष सिकंदर नदाफ यांनी संघाच्या पुणे जिल्हा सचिव पदासाठी काशिनाथ पिंगळे यांची निवड झाल्याचे जाहीर केले.

 काशिनाथ पिंगळे हे १२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांनी यापूर्वी भारतीय पत्रकार संघ बारामती तालुका अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. सचिवपदी निवड झाल्यानंतर पिंगळे यांनी सर्वांचे आभार मानले. पत्रकार संघाच्या वाढीसाठी यापुढे काम करणार असून पत्रकारांच्या अडचणी सोडवण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.

 यावेळी संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष रमेश लेंडे, जिल्हा उपाध्यक्ष तैनूर शेख, पुरंदर तालुकाध्यक्ष गोरख मेमाणे, बारामती तालुकाध्यक्ष विनोद गोलांडे, उपाध्यक्ष शंतनू साळवे, सचिव सुशीलकुमार अडागळे, पत्रकार हल्ला कृती समिती प्रमुख निखिल नाटकर, संघटक महमद शेख, सोमनाथ लोणकर, शरद भगत, अविनाश बनसोडे आदी पत्रकार उपस्थित होते.

उपस्थित सर्व पत्रकारांनी काशिनाथ पिंगळे यांना पुणे जिल्हा सचिवपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi