मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

बारामती ! महपुरूषांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या संभाजी भिडे वर कारवाई करा : आखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ची मागणी .  

mnewsmarathi 01 Aug 2023 1 मिनिट वाचन 9,587 वाचन

प्रतिनिधी – फिरोज भालदार

 राष्ट्रपिता महात्मा फुले व पं.जवाहरलाल नेहरू यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणारे मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्यावर तत्काळ गुन्हे दाखल व्हावे म्हणून . अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महापुरुषांबद्दल वारंवार जे होणारे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मनोहर भिडे उर्फ संभाजी भिडे यांचा जाहीर निषेध व्यक्त करून मनोहर भिडेवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी या निषेधाचे निवेदन वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरिक्षक सचिन काळे यांना देण्यात आले.

यावेळी अनिल लडकत पुणे जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, रोहिदास आबा कुदळे पुणे जिल्हा उपाध्यक्ष , ज्ञानेश्वर बापु कौले मा.सदस्य पुणे जिल्हा परिषद , संतोष यादव पुणे जिल्हा सरचिटणीस , दत्तात्रय लोणकर संघटक पुणे जिल्हा कार्यकारिणी, बाळासाहेब गायकवाड सभापती क्रुषी बाजार समिती निरा,

 सचिन जाधव सदस्य पुणे जिल्हा कार्यकारिणी, सचिन भुजबळ बारामती तालुका अध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले, निलेश आगम उपाध्यक्ष बारामती तालुका, अतुल शिंदे सामाजिक कार्यकर्ते, अतुल रासकर सदस्य बारामती तालुका कार्यकारिणी समता परिषद, सोमनाथ लोणकर सामाजिक कार्यकर्ते , सतीश लोणकर सामाजिक कार्यकर्ते,युवा नेते माणिक काळे मा.सरपंच पळशी, मुरलीधर ठोंबरे सरपंच मासाळवाडी, योगेश लोणकर सरपंच कार्हाटी, प्रसाद पिसाळ सामाजिक कार्यकर्ते,अजर तांबोळी मुस्लिम सेवा संघ महाराष्ट्र राज्य सदस्य, संदिप गाडेकर सामाजिक कार्यकर्ते ईत्यादी उपस्थित होते.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi