ऑगस्ट सुरू झाला तरी बारामती तालुका पावसाच्या प्रतीक्षेतच.

सामाजिक

प्रतिनिधि

 यंदा पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे.

 धरण क्षेत्रात थोडाफार पाऊस झाल्यामुळे धरण भरत आले आहे ही दिलासादायक बातमी सोडली तर शेतकऱ्याला यंदा पावसाने वंचितच ठेवल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे

 जून जुलै कोरडा बारामती तालुक्यावर ती दुष्काळाचे सावट असे चित्र तालुक्यात झालेली आहे. त्यातच थोडंफार विहिरीला पाणी आहे त्या शेतकऱ्यांनी भाजी,कोथिंबीर कष्टाची परकष्टा करून आणण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला देखील आज मातीमोल बाजारभाव मिळत आहे काही दिवसांपूर्वी टोमॅटोचे बाजार थोडे वाढले तर सर्वांच्या पोटात गोळा आला व टोमॅटो खूप महाग झाला अशा चर्चा सुरू झाल्या आता कवडीमोल बाजारा भावाने विकणारा भाजीपाला कोथिंबीर मुद्दल देखील त्यामध्ये निघत नाही असं का कोणीच पुढे येऊन सांगत नाही. मागील दोन-तीन वर्षापासून शेतकऱ्यावरती वारंवार अस्मानी अथवा सुलतानी संकट हे येतच आहे यातून कसा का होईना पण शेतकरी माझा सावरला पाहिजे व तहानलेल्या जमिनीची आग वरून राजाने विझवली पाहिजे. हीच आशा बाळगून शेतकरी राजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे