प्रतिनिधी – फिरोज भालदार
वडगाव निंबाळकर येथे चौकाचौकातून कुणाला शुभेच्छा देण्यासाठी तर कुणाची जाहिरात करण्यासाठी बॅनर लावले जातात हे जे बॅनर लावले जातात याची परवानगी ग्रामपंचायत मधून घेलती जाते का ? बॅनर लावणारे आपल्या बॅनर ची काळजी घेतात का ? की ह्या बॅनर मुळे कुणाला त्रास तर होत नाही ना .कोणाला अडचण तर होत नाही ना ह्याच प्रमाणे वडगाव निंबाळकर मध्ये महात्मा फुले चौकामध्ये व उमाजी नाईक चौक या ठिकाणी रोड च्या कडेला जे बॅनर लावले जातात ते बॅनर नीरा बारामती रोडवरून येणाऱ्या जानाऱ्या लोकांचे लक्ष्य वेधून घेतात व ह्यामुळे वडगाव निंबाळकर याठिकाणी नीरा बारामती रोडवर अपघात होण्याची शक्यता आहे . वडगाव निंबाळकर मध्ये बॅनर लावले जातात यांनी ग्रामपंचायत ची परवानगी घेतली आहे का नाही याची चौकशी ग्रामपंचायत कर्मचारी किंवा अधिकारी करतात का ?
महात्मा फुले चौकामध्ये एस टी चे स्टँड आहे त्याठिकाणी देखील बॅनर लावले जातात यामुळे त्याठिकाणी एस टी चे (स्टँड) बसस्थानक आहे म्हणून त्या लावले जाणारे बॅनर मुळे प्रवाशांना एस टी स्टँड दिसत नाही. यामुळे प्रवासी एस टी येईपर्यंत रस्त्यावरच उभे राहून एस टी ची वाट पाहत असतात . हे विनापरवाना (पोस्टर ) बॅनर लावणाऱ्यांवर प्रशासन कारवाई करणार का ? का अश्याच प्रकारे पुढे बॅनर लावणे चालू राहणार . वडगाव निंबाळकर हे गाव असेच जाहिरातीचे गाव म्हणूनच ओळखले जाणार का असा प्रश्न वडगाव निंबाळकर ग्रामस्थांमध्ये पडला आहे.
लवकरच आतापर्यंत किती नागरिकांनी बॅनर लावण्यासाठी परवानगी मागितली आहे याची माहिती माहिती अधिकारात ग्रामपंचायत प्रशासनाकडे मागवली जाणार आहे. तसेच आतापर्यंत किती अनाधिकृत बॅनर वरती कारवाई केली याची देखील माहिती मागवली जाणार आहे.