स्वातंत्र्यसंग्राम काळातील दुर्मिळ छायाचित्रांचे कवठेमहांकाळ येथे मल्टिमिडीया प्रदर्शन

माझा जिल्हा

प्रतिनिधी

केंद्रीय संचार ब्यूरोचा “मेरी माटी मेरा देश” अभियानानिमित विशेष उपक्रम

तरुणाईसाठी VR गॉगल्स; आणि डिजिटल पझल्सचे खास आकर्षण

फाळणी वेदना स्मृती दिनानिमित्त विशेष श्रद्धांजली कार्यक्रम

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा सांगता कार्यक्रम, मेरी माटी मेरा देश (माझी माती माझा देश) आणि फाळणी वेदना स्मृती दिवसानिमित माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, कोल्हापूर आणि कवठेमहांकाळ तहसीलदार कार्यालय तसेच पंचायत समिती कार्यालय यांच्या वतीने दिनांक १४ ते १६ ऑगस्ट २०२३ या कालावधीमध्ये तीन दिवसीय डिजिटल मल्टीमीडिया प्रदर्शनाचे आयोजन कवठेमहांकाळ तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले आहे. स्वातंत्र्यसंग्रामातील महत्वपूर्ण घटना आणि भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी घडलेल्या घडामोडी यासंदर्भात हे प्रदर्शन असेल.

सदर प्रदर्शनामध्ये १८५७ ते १९४७ पर्यतच्या स्वातंत्र्यसंग्रामाची माहिती, भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी घडलेल्या घडामोडी आणि घटनांविषयीची दुर्मिळ छायाचित्रे व माहिती प्रदर्शित केली जाणार आहे. VR गॉगल्स सारख्या डिजिटल मिडीयाच्या माध्यमातून स्वातंत्र्यसैनिक, ऐतिहासिक स्थळे आणि दुर्मिळ दृश्ये बघता येतील.

प्रदर्शनाचे उद्घाटन स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती तात्या पाटील यांच्या पत्नी श्रीमती सावित्री पाटील ह्यांच्या हस्ते सकाळी ११.०० वाजता करण्यात येणार आहे. यावेळी कवठेमहांकाळच्या तहसीलदार अर्चना कापसे, परीविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संदेश नाईक आणि अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हे प्रदर्शन सकाळी 10 ते रात्री 6 वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

भारतीय स्वातंत्र्यालढ्याबद्दल सामान्य नागरिकांना माहिती मिळावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.जास्तीत जास्त नागरिक, इतिहास अभ्यासक, संशोधक्, स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी छायाचित्र प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.