निरा बाजारातील चोरांना आळा बसणार कधी, कधी घेणार निरा बाजारपेठ मोकळा श्वास!

माझा जिल्हा

 संपादक मधुकर बनसोडे.

 पुरंदर तालुक्यातील निरा ही बाजारपेठ खऱ्या अर्थाने खूप मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते मेरा गावचा आठवडे बाजार हा बुधवारचा येतो आणि या आठवडे बाजारादिवशी अनेक जणांच्या मोबाईल चोऱ्या, पाकीट मारी, महिलांच्या गळ्यातले दाग दागिने, टू व्हीलर गाड्या. अशा चोऱ्या होत असतात

 या चोरांना आळा बसणार कधी सामान्य नागरिकाला न्याय मिळणार का आतापर्यंत झालेल्या चोऱ्यांपैकी पोलीस प्रशासनाने किती चोऱ्या उघड केल्या? अशी देखील चर्चा आता स्थानिक नागरिकांतून केली जात आहे

 दिवसभर कष्ट करून तीच भर पोटाची खळगी भरण्यासाठी माझा शेतकरी वर्ग ज्या वेळेस या बाजारपेठेत येतो आणि तेव्हा जर त्याचा खिसा कापला तर काय करावे आणि काय नाय हे त्या शेतकरी बांधवाला सुचत नाही इतकी वाईट अवस्था या बाजारपेठेतील चोरांनी करून ठेवलेली आहे. नवनिर्वाचित पोलीस प्रशासनात दाखल झालेले अधिकारी तरी नक्की या चोरांच्या मुस्क्या आवळतील का की या चोरांना असेच अभय राहणार?अशी चर्चा नागरिकांमधून होत आहे