मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

बारामती ! वडगाव निंबाळकर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती उत्साहात साजरी . 

mnewsmarathi 19 Aug 2023 1 मिनिट वाचन 9,198 वाचन

प्रतिनिधी – फिरोज भालदार

 वडगाव निंबाळकर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती चे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले . यावेळी उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक ऋषीआबा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बहुजन हक्क परिषदेचे युवक अधक्ष्य पै. नानासाहेब मदने , ग्रामपंचायत सदस्य संजय साळवे , अजित भोसले , तसेच बारामती तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत गडकरी ,बहुजन हक्क परिषदेचे पुणे जिल्हा संघटक पांडुरंग घळगे , राजेश्वर राजेनिंबाळकर आदी ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते .

उपस्थित मान्यवरांचे आयोजकांकडून शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी पोलीस सहायक निरीक्षक सचिन काळे व हेमंत गडकरी यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले . ह्या कार्यक्रमाचे आयोजन विक्रम साळवे , अक्षय (छोटू) जाधव , विशाल गायकवाड ,विशाल साळवे ,आर्यन साळवे ,संजय खुडे, व अण्णाभाऊ साठे मित्र परिवार यांनी केले होते . ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अमोल गायकवाड यांनी मानले .

लेखक

mnewsmarathi

M News Marathi