साहेबराव दादा विकास सोसायटीची 112 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.

माझा जिल्हा

 प्रतिनिधी.

 1911 साली स्थापन झालेल्या साहेबराव दादा विकास कार्यकारी सोसायटीची आज 112 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या आनंदाने बाबा कमल सभागृह निंबुत येथे पार पडली.

 शेतकऱ्यांना सावकाराच्या दारामध्ये कर्जासाठी जाऊ लागू नये यासाठी व शेतकऱ्याला आधार देण्यासाठी या संस्थेची स्थापना साहेबराव दादा काकडे देशमुख यांच्या माध्यमातून करण्यात आली होती. या संस्थेच्या माध्यमातून. शेतकऱ्यांना पीक कर्ज, मध्यम मुदत कर्ज, वाहन कर्ज, गावातील रेशन वाटप, शेतीसाठी लागणारे विविध खते पुरवली जातात.

 यावेळी सोसायटीच्या माध्यमातून सभासदांना 8% लाभांश वाटप करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. संस्थेला सर्व विभागातून जवळपास आठ लाख 94 हजार 527 रुपये इतका नफा झाला असल्याची माहिती यावेळी सचिव योगेश काकडे यांनी दिली.

 मागील वर्षी वार्षिक सभेमध्ये सभासदांच्या ठेवी स्वीकारण्याबाबत चर्चा झाली आणि जवळपास 18 लाख 89 हजार रुपयांच्या ठेवी सभासदांनी संस्थेकडे ठेवलेल्या आहेत. इतर सभासदांनी देखील संस्थेकडे मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवाव्यात जेणेकरून संस्था स्वबळावरती चालली पाहिजे असे यावेळी बोलताना श्री सतीश काकडे यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर जपून करावा पाऊस न झाल्यास मोठी बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते असा सल्ला श्री शामराव (काका ) साहेबराव काकडे देशमुख यांनी दिला. संस्थेचे चेअरमन, संचालक, व सभासद यांनी आपले मनोगत व्यक्त केले

 या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी बहुसंख्य सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.