संपादक मधुकर बनसोडे.
श्रावण महिन्यातला आज तिसरा सोमवार असून श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर येथे आज जवळपास 50 ते 60 हजार भाविकांनी सोमेश्वराचे दर्शन घेतले रात्री बारा वाजल्यापासूनच दर्शनाच्या रांगा सुरू झाल्या होत्या.
सोमेश्वराच्या दर्शनासाठी राज्यातूनच नव्हे तर परराज्यातून देखील भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात.
रात्री बारा वाजता आरती झाल्यानंतर दर्शनाच्या रांगा सुरू करण्यात आल्या पूर्ण दिवसभर दर्शन हे रांगेतूनच चालू होते.
आलेल्या भाविकांसाठी महाप्रसाद व खिचडी वाटप विजयकुमार सोरटे यांच्या वतीने करण्यात आले.
तसेच बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र होळ येथील कर्मचाऱ्यांनी नागरिकांना फळवाटप करीत वाढदिवस साजरा केला. यावेळी सोमेश्वर देवस्थानचे चेअरमन यांच्याकडून देवस्थानच्या वतीने डॉक्टर खोमणे त्यांच्या पत्नी प्रणिती खोमणे यांचा सन्मान करण्यात आला
तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र होळ यांच्या वतीने येणाऱ्या भाविकांचेआरोग्य चेकअप केले जात होते. सोमेश्वर देवस्थानच्या वतीने. येणाऱ्या भाविकांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, सर्व परिसर स्वच्छथा मय ठेवण्यात आला होता.