राष्ट्रीय लाळ खुरकत रोग नियंत्रण जागृती सप्ताहाचे ११ ते १७ सप्टेंबरदरम्यान आयोजन

माझा जिल्हा

प्रतिनिधी

पशुसंवर्धन विभागाद्वारे ११ ते १७ सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय लाळ खुरकत रोग नियंत्रण जागृती सप्ताह साजरा करण्यात येणार असून याअंतर्गत पशुपालक, पशुवैद्यक, स्वंयसेवी संस्था, पशुवैद्यकीय कर्मचारी, लसीकरण करणारे सेवादाता यांचे जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

लाळ खुरकत रोग हा गायवर्ग, म्हैस वर्ग, शेळ्या, मेंढ्या, वराह यासारख्या दोन खूर असलेल्या प्राण्यांमधील एक अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य आजार आहे. या रोगाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना, लसीकरण आदींच्या अनुषंगाने जागृती सप्ताहात राज्यातील सर्व पशुरोग निदान प्रयोगशाळा ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करणार आहेत व यापूर्वी प्रादुर्भाव झालेल्या गावातही शिबिरे व व्याख्याने आयोजित केली जाणार आहेत, असे पशुसंवर्धन विभागाच्या औंध येथील रोग अन्वेषण विभागाचे सह आयुक्त पशुसंवर्धन डॉ. याह्या खान पठाण यांनी कळविले आहे.