जनहित प्रतिष्ठानच्या विद्यालयात तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न..

माझा जिल्हा

प्रतिनिधी

बारामती- जिल्हा क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे, बारामती तालुका क्रीडा शिक्षक संघटना व जनहित प्रतिष्ठानचे विद्यालय बारामती यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुका क्रीडा स्तरीय कबड्डी स्पर्धा १४, १७ व १९ वर्षाखालील मुले व मुली या गटातील दिनांक ६ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर २०२३ या कालावधीत जनहित प्रतिष्ठानचे विद्यालयात संपन्न झाल्या.

स्पर्धांचे उद्घाटन मा. श्री. सुनील प्रभाकर देशपांडे व तालुका क्रीडा अधिकारी मा.श्री. महेश चावले साहेब यांचे हस्ते व शाळेचे अध्यक्ष व संचालक मंडळ व अन्य मान्यवर यांचे उपस्थितीत संपन्न झाला.

या स्पर्धांमध्ये ७० शाळांच्या मुलांचे शंभरावर संघ व मुलींच्या ८२ संघांनी सहभाग घेतला या स्पर्धांमध्ये जनहित प्रतिष्ठानचे विद्यालयाच्या मुलींनी १७ खालील वयोगटात प्रथम क्रमांक मिळवून आपली यशस्वी परंपरा कायम ठेवली आहे. संघातील कु. मधुरा कुंभार, कु. ज्योतीर्मयी शिंदे, कु. वैष्णवी साबळे या मुलींनी केलेल्या आक्रमक पकडी व चढाया या आकर्षणाचे केंद्र ठरल्या संघाला क्रीडाशिक्षक श्री. सचिन नाळे (एन.आय.एस.कोच) व श्री.अजिंक्य साळी यांचे मार्गदर्शन लाभले या स्पर्धेचे गटवार विजेते संघ पुढीलप्रमाणे

१४ वर्षे वयोगट मुले

प्रथम क्रमांक:- न्यू इंग्लिश स्कूल डोर्लेवाडी.

द्वितीय क्रमांक:- श्री मयुरेश्वर विद्यालय मोरगाव .

तृतीय क्रमांक:- शारदाबाई पवार विद्यानिकेतन शारदानगर.

चतुर्थ क्रमांक:- सोमेश्वर विद्यालय सोमेश्वरनगर.

१७ वर्षे वयोगट मुले

प्रथम क्रमांक:- शारदाबाई पवार विद्यानिकेतन शारदानगर.

द्वितीय क्रमांक:- तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती.

तृतीय क्रमांक:- न्यू इंग्लिश स्कूल डोर्लेवाडी.

चतुर्थ क्रमांक:- सोमेश्वर विद्यालय सोमेश्वरनगर.

१९ वर्षे वयोगट मुले

प्रथम क्रमांक:- विद्याप्रतिष्ठान कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय विद्यानगरी.

द्वितीय क्रमांक:- शारदाबाई पवार विद्यानिकेतन शारदानगर

तृतीय क्रमांक:- वस्तीगृह विद्यालय काऱ्हाटी

चतुर्थ क्रमांक:- सोमेश्वर विद्यालय सोमेश्वरनगर,

१४ वर्षे वयोगट मुली

प्रथम क्रमांक:- संत तुकाराम महाराज प्राथमिक विद्यालय डोर्लेवाडी.

द्वितीय क्रमांक:- जनहित प्रतिष्ठानचे प्राथमिक विद्यालय बारामती.

तृतीय क्रमांक:- न्यू इंग्लीश स्कूल मेखळी

चतुर्थ क्रमांक:- म.ए.सो. विद्यालय बारामती,

१७ वर्षे वयोगट मुली

प्रथम क्रमांक:- जनहित प्रतिष्ठानचे माध्यमिक विद्यालय बारामती.

द्वितीय क्रमांक:- म.ए.सो. विद्यालय बारामती.

तृतीय क्रमांक:- आर. एन. आगरवाल टेक्नकल हायस्कूल.

चतुर्थ क्रमांक:- शारदाबाई पवार विद्यानिकेतन शारदानगर.

१९ वर्षे वयोगट मुली

प्रथम क्रमांक:- विद्याप्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय विद्यानगरी.

द्वितीय क्रमांक:- शारदाबाई पवार महिला आर्टस, कॉमर्स अॅन्ड सायन्स महाविद्यालय शारदानगर.

तृतीय क्रमांक:- मु.सा. काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर.

चतुर्थ क्रमांक:- शारदाबाई पवार विद्यानिकेतन शारदानगर.

सर्व विजेत्या संघांना व पंचांना विद्यालयात तर्फे सन्मानचिन्ह देऊन कौतुक करण्यात आले प्रथम क्रमांकाचे संघांना जिल्हा पातळीवर खेळण्याची संधी मिळणार आहे. सर्वांचेच कौतुक क्रीडा अधिकारी श्री महेश चावले साहेब यांनी केले उत्तम आयोजनाबद्दल ही कौतुकोदगार काढले. जिल्हा पातळीवर खेळणाऱ्या सर्व संघांसाठी व खेळाडूंसाठी आपण सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचे कबड्डी कोच प्रो कबड्डी खेळाडू श्री. दादासाहेब आव्हाड यांनी सांगितले.

निगडी गुरुकुल चे मा.श्री. श्रीकृष्ण अभ्यंकर यांनी सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व खेळ आनंदासाठी खेळावा असे म्हणले. संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. किशोर कानिटकर यांनी स्पर्धा आयोजनाची संधी मिळाल्यानंतर जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने स्पर्धा पूर्ण केल्याबद्दल विद्यालयाचे सर्व शिक्षक व क्रीडा शिक्षकांचे, पंचांचे अभिनंदन केले व श्री निलेश भोंडवे यांनी आभार मानले.

याप्रसंगी जनहित प्रतिष्ठान विद्यालयाचे अध्यक्ष मा.श्री. किशोर कानिटकर, उपाध्यक्ष मा.श्री. सतिश गायकवाड, संचालक मा.श्री. हृषीकेश घारे, मा.श्री. किरण शहा (वाडीकर), मा.श्री. किशोर शिवरकर, मा.श्री. रविंद्र शिराळकर, मा.श्री. मिलिंद अत्रे, मा.श्री. प्रशांत चौहान, मा.श्री. विक्रम कुलकर्णी, आचार्य मा.श्री. हनुमंत दुधाळ, मुख्याध्यापक मा.श्री. अतुल कुटे, सर्व संचालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.