प्रतिनिधी- फिरोज भालदार
श्रावण महिन्यातील चौथा सोमवार श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर सोमेश्वराचे दर्शन घेण्यासाठी रात्री १२ वाजल्यापासून दर्शनासाठी रांगा सुरू झाल्या होत्या. शेवटचा सोमवार असल्याने यावेळी देवाची महापूजा चे आयोजन करण्यात आले होते . यावेळी बारामती DYSP गणेशराव इंगळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बारामती अध्यक्ष संभाजिनाना होळकर , राजेंद्रराव काकडे व सौ मंदाकिनी राजेंद्र काकडे , अर्बन बँक चेअरमन बारामती सचिन सातव व त्यांची पत्नी या मान्यवरांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.
सकाळी ९.१५ वाजण्याच्या दरम्यान वाजत गाजत करंजे व आंबवडे ता. खटाव तसेच खोमणे परिवार व पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्या तर्फे पालखीची विधिवत पूजा मानसन्मान करण्यात आले.
प्राथमिक आरोग्य केंद्र होळ यांच्यातर्फे भाविकांसाठी मोफत आरोग्य सेवेची व्यवस्था करण्यात आली होती. वाहनांसाठी वाहन पार्किंग ची व्यवस्था देखील सोमेश्वर देवस्थान यांच्यातर्फे करण्यात आले होते. सोमेश्वर मंदिर दर्शनासाठी बारामती एस टी महामंडळ तर्फे सोमेश्वर दर्शन यात्रा स्पेशल एसटी बसेस ची सोय करण्यात आली होती.
दुपारचा महाप्रसाद सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे ठेवण्यात आला होता व संध्याकाळचा महाप्रसाद प्रमोद कुमार गीते व नामदेव अण्णा शिंगटे यांच्या तर्फे आयोजित करण्यात आले होते.
यात्रा काळात वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे API सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करंजेपुल पोलीस चौकीचे PSI योगेश शेलार यांच्याकडून चोख व कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
शेवटचा सोमवार असल्याने दर्शनासाठी राज्यातून नव्हे तर परराज्यातून देखील भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी आले होते. शेवटच्या सोमवारी सुमारे दोन लाख भाविकांनी सोमेश्वराचे दर्शन घेतले.
सोमेश्वर मंदिर देवस्थान तर्फे यावेळी चेअरमन प्रताप भांडवलकर, सचिव संतोष भांडवलकर, राजेंद्र भांडवलकर ,राहुल भांडवलकर ,खजिनदार सोमनाथ भांडवलकर व आदी ग्रामस्थ उपस्थित होते.