• Home
  • माझा जिल्हा
  • सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयात पर्यावरण जनजागृती विषयक निसर्ग गणेश कार्यशाळा संपन्न झाली.
Image

सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयात पर्यावरण जनजागृती विषयक निसर्ग गणेश कार्यशाळा संपन्न झाली.

प्रतिनिधी

सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जनजागृती पर निसर्ग गणेश कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

 गणेशोत्सव हा संपूर्ण भारतीयांच्या भक्तीचे श्रद्धेचे आणि संस्कृतीचे प्रतीक आहे, परंतु गणेशोत्सवाला आलेले रंजक स्वरूप मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण व ध्वनी प्रदूषणाला चालना देते म्हणून गणेशोत्सव हा पर्यावरण पूरक व्हावा या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित केली गेली. या कार्यशाळेस एकूण २०४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

    या कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजी. आणि टेक्नॉलॉजी कॉलेज चे प्रा.दिनेश काटे व प्रा. चिन्मय नाईक हे लाभले होते. यामध्ये प्रा.चिन्मय नाईक यांनी गणेशोत्सवातील पावित्र्य आणि पर्यावरण संरक्षण यासाठी पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले. प्रा दिनेश काटे यांनी शाडूच्या मातीपासून पर्यावरण पूरक गणपती तयार कसा करायचा याचे प्रात्यक्षिक सर्व विद्यार्थ्यांना दिले. यावेळेस द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी कु. भूमिका जायपत्रे हिने ही उत्कृष्ट गणेशमूर्ती साकारली.

कार्यशाळेचे प्रस्ताविक व आयोजन कार्यक्रम अधिकारी प्रा.राजेश निकाळजे यांनी केले, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.धनंजय बनसोडे यांनी पर्यावरण समतोल राखणे गरजेचे आहे असे सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रा संपतराव सूर्यवंशी यांनी अध्यक्षीय मनोगतामध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिस व रासायनिक रंग वापरून बनवलेल्या गणेश मूर्तींमुळे जलजीवसृष्टीला हानी पोहचते असे मत व्यक्त केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सुनिता घाडगे व आभार जयश्री भोसले यांनी केले.

 यावेळेस प्रा अतिश यादव प्रा.अजित जगताप,प्रा. शुभम ठोंबरे, प्रा समृद्धी पवार , श्री.अमित काकडे , श्री. संदीप जगदाळे व रा. से.यो सदस्य , प्राध्यापक प्राध्याकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026