प्रतिनिधी
सोमेश्वरनगर: सेकंड इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिप २०२३ असोसिएशनच्या वतीने मुंबई येथे आयोजित केलेल्या
आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सोमेश्वरनगर येथील स्पर्धकांनी उत्तुंग यश प्राप्त केले मुंबई येथील अंधेरी क्रीडा संकुलात या स्पर्धा पार पडल्या यात
भारत इराण नेपाळ म्यानमार श्रीलंका भूतान या देशातील खेळाडू सहभागी झाले होते या स्पर्धेत१० ते १२ या वयोगटात
श्रीकांत सोमनाथ काळे (गोल्ड मेडल) तसेच वेदांत राहुल कांबळे सिल्वर) (मेडल व प्रथमेश संतोष गायकवाड (सिल्वर मेडल)
१२ ते १४ या वयोगटात अभिनंदन चंद्रकांत धायगुडे (गोल्ड मेडल) सार्थक राजेंद्र सकाटे यांनी (सिल्वर मेडल) वर नाव कोरले
यशस्वी स्पर्धकांचे असोसिएशनचे अध्यक्ष सिहान रेन यांनी अभिनंदन केले यशस्वी स्पर्धकांना संस्थेचे ग्रँडमास्टर प्रकाश रासकर यांचे मार्गदर्शन लाभले