निंबुतच्या पोलीस पाटील पदी मनिषा गणेश साळवे.

माझा जिल्हा

 संपादक मधुकर बनसोडे.

 निंबुत गावच्या पोलीस पाटील पदी सौ मनीषा गणेश साळवे यांची वर्णी लागली मनीषा साळवे या एफ वाय बी ए. झालेल्या असून त्यांचे शिक्षण श्री शहाजी माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय सुपे येथे झालेले होते पोलीस पाटील पदी निवड झाल्यानंतर आमच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी सांगितले की फॉर्म भरायचे आहेत हे फार उशिरा समजले त्यामुळे खूप धावपळ झाली मात्र जिद्द व चिकाटी सोडली नाही गेल्या काही वर्षांपासून पोलीस भरतीचा अभ्यास करीत असल्यामुळे पोलीस पाटील भरती परीक्षेसाठी मला त्याचा फार मोठा फायदा झाला. शेवटी बोलताना सांगितले की कितीही अपयश आले कितीही अडचणी आल्या तरी जिद्द व चिकाटी सोडू नये नक्कीच याचा फायदा यशाच्या जवळ जाण्यासाठी होतो.

 निंबूत व परिसरातील ग्रामस्थांमधून साळवे यांचे अभिनंदन केले जात आहे.