मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

ससून सर्वोपचार रुग्णालयास २५ लाख रुपयांच्या सोनोग्रॉफी मशीनची देणगी

mnewsmarathi 19 Oct 2023 1 मिनिट वाचन 9,238 वाचन

प्रतिनिधी

 ससून सर्वोपचार रुग्णालय येथील क्ष-किरणशास्त्र विभागात स्व. सौ. बदामीबाई जीवराजजी किताबत बाली पुणे यांच्या स्मरणार्थ किताबत कुटुंबाकडून २५ लाख रुपयांचे विप्रो जीई या कंपनीचे बोल्युसॉन पी-८ बीटी-२० सोनोग्राफी मशीन देणगी स्वरुपात देण्यात आले.

यावेळी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, विभागप्रमुख डॉ. शेफाली पवार, पुष्पा प्रकाशजी सोनव्या, दिलीप किताबत, रमेश किताबत, किरण किताबत आदी उपस्थितीत होते.

अधिष्ठाता डॉ. ठाकूर म्हणाले, रुग्णालयात आलेल्या प्रत्येक रुग्णाला उच्च दर्जाची अत्याधुनिक सेवा मिळावी असा रुग्णालयाचा प्रयत्न आहे. आर्थिक परिस्थितीमुळे कोणताही रुग्ण अत्याधुनिक उपचारापासून वंचित राहू नये यासाठी अत्याधुनिक सेवा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

विभागप्रमुख डॉ. पवार यांनी देणगीदारांना सोनोग्राफी मशीन दिल्याबद्दल धन्यवाद दिले.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi