प्रतिनिधी – फिरोज भालदार
दि. २/११/२०२३ रोजी चोपडच ग्रामपंचायत सदस्य वीद्या कोळेकर यांचे तीन अपत्य असल्याबाबत सदस्यत्व पद जिल्हाधिकारी पुणे न्यायालय यांचे आदेशाने अपात्र करण्यात आले होते . आता यामध्ये चोपडज ग्रामपंचायत सरपंच पुष्पलता जगताप यांचे सरपंच व सदस्य पद अपात्र झाल्याचे आदेश न्यायालयाकडून आले आहेत.
बारामती तालुक्यातील चोपडज गावच्या सरपंच पुष्पलता बाळासाहेब जगताप यांना सार्वत्रिक निवडणूक २०२१ च्या उर्वरित कालावधीसाठी ग्रामपंचायत चोपडजच्या सरपंच व सदस्य पदावरून अपात्र ठरविण्यात येत असल्याचा आदेश विभागीय आयुक्त सौरभराव यांनी दिला. ग्रामपंचायत चोपडजच्या नियमबाह्य व बेकायदेशीर कामकाजाबाबत सुधीर दिलीप गाडेकर , जयश्री गाडेकर , अझर तांबोळी , उमेश गायकवाड , व इतर जणांनी बारामती पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे दिनांक १० मार्च २०२२ रोजी तक्रार अर्ज सादर दाखल केला होता. तक्रारदारांच्या वतीने ॲड. इम्रान खान यांनी काम पाहिले .
या तक्रार अर्जाची प्राथमिक चौकशी करून गटविकास अधिकारी यांनी दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ रोजी जिल्हा परिषदेत अहवाल सादर केला होता.
या अहवालामध्ये तक्रार अर्जाच्या अनुषंगाने सादर करण्यात आलेल्या अभिप्रायास अनुसरून तो प्रस्ताव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विभागीय आयुक्त कार्यालयास सादर केला . या अहवालानुसार चोपडजच्या ग्रामसेवकांविरुद्ध तत्कालीन नियमबाह्य देखील कामकाजास्त प्रशासन कारवाई करण्यात आल्याचे निदर्शनास आले . सर्व विवेचनाआंती चोपडजच्या सरपंच पुष्पलता जगताप यांना सार्वत्रिक निवडणूक २०२१ या उर्वरित कालावधीसाठी सरपंच व सदस्य पदावरून अपात्र ठरवण्याचा आदेश विभागीय आयुक्त कडून देण्यात आला.
सरपंच पद अपात्र झाल्याचे नोटीस आदेश आले समजताच अर्जदार ,विरोधक व ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे हलगी ताश्याच्या गजरात गुलाल उधळत फटाक्यांची आतिषबाजी करत अर्जदारांची मिरवणूक काढत सत्कार करण्यात आला .