• Home
  • माझा जिल्हा
  • श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगाने १३ नोव्हेंबर रोजी वाहतुकीत बदल
Image

श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगाने १३ नोव्हेंबर रोजी वाहतुकीत बदल

प्रतिनिधि

पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे १३ नोव्हेंबर रोजी श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगाने वाहतूक कोंडी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत.

वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून १३ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजेपासून ते रात्री १० वाजेपर्यंत पुणे ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ आणि पुणे ते बारामती या मार्गावरील जड, अवजड व इतर वाहतूक बंद करुन अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

जेजुरी पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्दीतील वाहतुक बदल: सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथून पुणे येथे जाण्याकरीता जेजुरी-सासवडकडे येणारी जड, अवजड वाहनांची वाहतुक पुर्णपणे बंद करुन त्यावरील वाहने निरा-मोरगाव-सुपा ते केडगाव चौफुला मार्गे सोलापुर महामार्ग क्रमांक ६५ वरुन पुणे यामार्गाने वळविण्यात येत आहे. . पुण्याकडून बारामतीकडे येणारी वाहतुक बेलसर-कोथळे-नाझरे-सुपे-मोरगाव रोड मार्ग बारामती या मार्गे वळविण्यात येत आहे.

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्दीतील वाहतुक बदल: बारामती व निरा बाजूकडून जेजुरी मार्गे पुणे बाजूकडे जाणारी जड, अवजड वाहनांची वाहतुक पुर्णपणे बंद करुन ती मोरगाव-सुपा-केडगाव चौफुला मार्गे सोलापुर महामार्ग क्रमांक ६५ वरुन पुणे या मार्गे वळविण्यात येत आहे.

सासवड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्दीतील वाहतुक बदल: पुणे बाजुकडून जेजुरी मार्गे फलटण-सातारा बाजुकडे जाणारी जड, अवजड वाहनांची वाहतुक पुर्णपणे बंद करुन सासवड- नारायणपुर-कापुरहोळ मार्गे सातारा-फलटण किंवा सासवड-वीर फाटा-परींचे-वीर-वाठार मार्गे लोणंद या मागे वळविण्यात येत आहे.

वाहतुकीस लावलेले निर्बंध १३ नोव्हेंबर रोजीच्या ‘श्री खंडोबा देवाची सोमवती यात्रे’करीता येणाऱ्या हलक्या वाहनांसाठी शिथील राहतील. नागरिकांनी वाहतूकीत केलेल्या बदलाची नोंद घेवून सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Releated Posts

सतीश भैया कल्याणकारी संघाच्या वतीने जेष्ठ नागरिक व बारा वर्षे पुढील मुली व महिलांसाठी एसटी बसचा पास काढणे शिबिर आयोजन.

प्रतिनिधी  बारामती. निंबुत येथे सतीश भैय्या कल्याणकारी संघ यांच्या वतीने निंबुत गावातील बारा वर्षावरील मुली, व महिलांसाठी एसटी…

ByBymnewsmarathi Jun 19, 2026

सोमेश्वर विद्यालयात नवागतांचे स्वागत

मोरगाव – प्रतिनिधी सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयात पाचवीच्या वर्गात दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ; जलसंधारण व शेती विकासाला नवी गती

सहसंपादक – अक्षय थोरात खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री…

ByBymnewsmarathi Jun 10, 2026