मुख्य मजकुरावर जा
Wednesday, 16 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 11 November 2023 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

बारामती ! एम न्यूज मराठीच्या बातमीची दखल घेत वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनकडून अवैद्य धंद्यावरती कारवाई .

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
November 11, 2023 1 मिनिट वाचन 8,520 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

संपादक – मधुकर बनसोडे

एम न्यूज मराठी कडून वडगाव निंबाळकर येथे अवैध धंदे वाल्यांवरती बातमी प्रसारित करण्यात आलेली होती. या बातमीची दखल घेत वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन यांच्याकडून अवैध धंदे वाल्यांवरती कारवाई करण्यात आली आहे .

दिनांक १०/ ११ / २०२३ रोजी दुपारी ३.४५ वा. चे सुमारास वडगाव निंबाळकर ता. बारमती गावचे हद्दीत उमाजी नाईक चौकात रोडच्या कडेला असलेल्या वैभव हॉटेलच्या शेजारी असणाऱ्या गाळ्यामध्ये १) श्रीकांत कैलास शेलार २ ) प्रशांत दीपक साळवे ३) रितेश सोमनाथ गायकवाड यांच्यापाशी बेकायदा , बिगरपरवाना एक संगणक किंमत ९००० रू , सॅमसंग कंपनीचा एक ११५०० रू मोबाईल फोन व रोख रक्कम २३० रू असा त्यांच्यापाशी मुद्देमाल मिळाला आहे .

पोलिसांनी संगणकाची पाहणी केली असता त्यामध्ये एक ते दहा असे आकडे व चक्री फिरत असलेली दिसून आली . यावरून पोलीस कॉन्स्टेबल अमोल निवृत्ती भुजबळ यांनी या तिघांवर फिर्याद दाखल करून जुगार कायदा कलम (१२) अ प्रमाणे कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पुढील तपास ए. एस. आय फणसे हे करीत आहेत .

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख