मुख्य मजकुरावर जा
Wednesday, 16 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 11 November 2023 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

बारामती ! मुढाळे ग्रामपंचायत सरपंच जयपाल साळवे व सदस्य अक्षय कदम यांचा वडगांव निंबाळकर मध्ये नागरी सत्कार .

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
November 11, 2023 1 मिनिट वाचन 8,519 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी – फिरोज भालदार

बारामती तालुक्यातील मुढाळे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी जयपाल साळवे यांना थेट जनतेतून निवडून सरपंच होण्याचा मान मिळाला असून ते लोकनियुक्त सरपंच झाल्याबद्दल व मुढाळे ग्रामपंचायत सदस्यपदी अक्षय कदम यांची निवड झाल्याबद्दल बारामती तालुका बहुजन हक्क परिषद व वडगाव निंबाळकर ग्रामस्थांकडून त्यांचा नागरिक सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.

या कार्यक्रमासाठी वडगाव निंबाळकर येथील युवा उद्योजक नंदू जाधव ,सतीश साळवे, बहुजन हक्क परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष नानासाहेब मदने, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष पांडुरंग घळगे ,बारामती तालुका युवक अध्यक्ष अमोल गायकवाड , सतीश साळवे ,सोनू खोमणे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख