सावित्रीबाई फुले यांची जयंती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंबूत येथे साजरी.

माझा जिल्हा

प्रतिनिधी.

 स्त्री शिक्षणाचे दरवाजे खऱ्या अर्थाने स्त्रियांसाठी ज्यांनी खरी उघडली त्या सावित्रीबाई फुले या कार्यामध्ये नेहमीच त्यांच्या खांद्याला खांदा देऊन काम करणाऱ्या फातिमा शेख. आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंत निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंबुत येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक पालक वर्ग विद्यार्थी यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

 यावेळी शाळेतील सावित्रीच्या लेकींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा परिधान करून आपले मनोगत व्यक्त केले. सातारा जिल्ह्यातील नायगाव या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. ज्योतिबा फुले यांच्याशी त्यांचा विवाह झाल्यानंतर ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना शिक्षणाची गोडी निर्माण करून शिक्षण दिले.

 त्याच शिक्षणाच्या जोरावर ती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचे दरवाजे खुले केले. त्याच जोरावर खऱ्या अर्थाने आज सावित्रीची लेक शिकून मोठ्या पदावर ती बसू लागली आहे अशा भावना विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या.

 या कार्यक्रमाची प्रस्तावना अनपट सर, व बालगुडे मॅडम यांनी केली तर आभार शेंडकर मॅडम यांनी मानले