प्रतिनिधी
सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभाग, एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया, राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत इपिलेप्सी फाऊंडेशनच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथे रविवार ७ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता इपिलेप्सी (अपस्मार) शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबीरात न्युरोफिजिशियन डॉ. निर्मल सूर्या व त्यांचे सहकाऱ्याच्यावतीने इपिलेप्सी (आकडी अपस्मार, फेफरे, फीट येणे) अशा रुग्णांची मोफत ई.ई.जी. रक्ततपासणी करुन उपचार करण्यात येणार आहे. तसेच रुग्ण व नातेवाईकांचे समुपदेशनही करण्यात येणार आहे. भौतिकोपचार, व्यवसायोपचार, वाचा व भाषाविकार उपचारही करण्यात येणार आहेत. रुग्णाला तीन महिन्यांची औषधेही विनामूल्य दिली जाणार आहेत.
या शिबीराचा लाभ घेण्यासाठी रुग्णांची पूर्वनोंदणी आवश्यक असून आशा स्वयंसेविका, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयाशी किंवा ८६२६०६३८५८, ७०८३९५४४५७ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. या शिबाराचा अधिकाधिक गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.