वडगाव निंबाळकर मध्ये पहिल्या महिला तंटामुक्ती अध्यक्षा सौ.माया मिलिंद साळवे

राजकीय

प्रतिनिधी – फिरोज भालदार

वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत ग्रामसभेमध्ये वडगाव निंबाळकर चे तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून सौ. माया मिलिंद साळवे यांची नियुक्ती करण्यात आली. या पदासाठी एकूण 17 अर्ज आले होते त्यापैकी सौ.माया मिलिंद साळवे यांना सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत सर्वांच्या एकवट्याने महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. वडगाव निंबाळकर मध्ये पहिल्या महिला तंटामुक्ती अध्यक्ष बनल्या यामुळे सौ. माया साळवे यांचा पुष्पहार श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला .

महिला ग्रामसभेमध्ये गावातील महिला बचत गटाच्या महिलांनी वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत कर वसुलीसाठी ग्रामपंचायतीस मदत करण्याचे ठरवले . सभेमध्ये संविधान सभागृह ठरावाची मंजुरी देण्यात आली. आंबेडकर भवन आणि संविधान सभागृह हे एकत्र मिळून वडगाव निं. गट नंबर 734 गावठाण हद्दीमध्ये बांधण्याचा ठराव सभेत करण्यात आला.

याचदरम्यान सभेत स्वातंत्र्य विद्या मंदिर हायस्कूल ने ग्रामपंचायत ने मंजूर केलेली संरक्षण भिंत ही बांधून न दिल्याने ग्रामसभेत निषेध व्यक्त करण्यात आला. 23 / 24 चा आराखडा व अंदाजपत्रक बनवण्यात आले आहे . अशी माहिती सरपंच सुनील ढोले यांनी दिली.

यावेळी सभेमध्ये वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच ,सदस्य, व ग्रामस्थ उपस्थित होते.