• Home
  • क्राईम
  • लग्नाचे आमिष दाखवून वर्गशिक्षकाकडून विद्यार्थिनीवर अत्याचार; पत्नीनेच केला भांडाफोड
Image

लग्नाचे आमिष दाखवून वर्गशिक्षकाकडून विद्यार्थिनीवर अत्याचार; पत्नीनेच केला भांडाफोड

प्रतिनिधी

आपल्याच शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला मुलचेरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विश्वजीत मिस्त्री (३८) असे आरोपी शिक्षकाचे नाव असून त्याचा पत्नीनेच या प्रकरणाचा भांडाफोड केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पीडितेचा वर्गशिक्षक आहे. मागील काही महिन्यांपासून दोघांमध्ये संबंध होते. लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने विद्यार्थिनीसोबत वेळोवेळी शरीरसंबंध प्रस्थापित केले. दरम्यान, आरोपी शिक्षकाच्या पत्नीला संशय आल्याने तिने त्याचा मोबाईल तपासला असता त्यात दोघांमधला संवाद आढळून आला. हा प्रकार तिने मुख्याध्यापकाच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. यावरून आरोपी शिक्षक विश्वजीत मिस्त्री याच्यावर १९ जानेवारी रोजी संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास अत्याचार व ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दखल करून त्याला ताब्यात घेतले

.

Releated Posts

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय सोनवणे…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026