प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत विद्यार्थी आर्थिक साक्षर व्हावेत या उद्देशाने निंबुत येथील श्री.बा.सा. काकडे दे.विद्यालयात शनिवार दि. २०/०१/२०२४रोजी स.९.००वा. खाऊ-गल्ली उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमाचे उद्घाटन भारतीया ज्युबिलंट फाउंडेशनच्या सी.आर .सी.प्रमुख सायली फुंडे मॅडम व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.दिपाली ननावरे यांच्या शुभहस्ते झाले.
या उपक्रमास विद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला. यामध्ये इ.५वी ते १०वी च्या निवडक विद्यार्थ्यांनी स्वतः व मित्र मैत्रिणी ,पालक यांच्या मदतीने तयार केलेले विविध पदार्थ विद्यालयात विक्रीसाठी आणले.यामध्ये वडापाव,मिसळपाव, भजी,उपीट,पाणीपुरी,पोहे,ओली भेळ, ,ढोकळा,डोसा,सरबत, चहा,कॉफी इत्यादी पदार्थांचा समावेश होता.हे सर्वच पदार्थ अतिशय रुचकर व स्वादिष्ट होते.या खाऊ गल्लीचा विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी प्रत्येक स्टॉलला आवर्जून भेट देऊन पदार्थांचा आस्वाद घेतला.भरघोस विक्रीतून प्रत्येक स्टॉल वरील विद्यार्थ्यांना चांगली कमाई झाली.
या कार्यक्रमाचे संयोजन विद्यालयातील शिक्षकश्री.येळे एस. एस.यांनी केले.सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. दिपाली ननावरे यांनी केले.
निंबुत ग्रामविकास प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.सतीशभैय्या काकडे दे.,उपाध्यक्ष मा.श्री.भीमराव बनसोडे व मानद सचिव मा.श्री. मदनराव काकडे दे.यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.