संपादक मधुकर बनसोडे.
शहरी भागातील केबल इंटरनेटचे लॉन ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात वाऱ्यासारखे पसरले आहे मात्र केबल चालक इंटरनेट चालक महावितरण कंपनीच्या विद्युत खांबावरती अनाधिकृतपणे या केबल वायर गुंडाळून ग्रामीण भागाचे विद्रूपीकरण करीत आहेत.
कोट्यावधी रुपये खर्च करून ज्या ठिकाणी स्वच्छ सुंदर गाव दिसण्यासाठी सुशोभीकरण केलं त्याच ठिकाणी दुसऱ्या बाजूने महावितरण कंपनीच्या विद्युत पोल वरून टांगलेल्या केबलच्या व इंटरनेटच्या वायर ग्रामीण भागाच्या विद्रोपीकरणास कारणीभूत ठरत आहेत. एकीकडे घरातील विज बिल एक महिन्याचे जरी थकले तरी महावितरण कंपनीकडून लगेच ते खंडित करण्याचे आदेश दिले जातात मात्र दुसरीकडे कोणत्या परवानगीनुसार केबल चालकांना महावितरणच्या विद्युत पोलचा वापर करण्याची परवानगी दिली आहे याचा खुलासा महावितरण ने करावा.
जर अशा प्रकारे कोणतीही परवानगी दिली नसेल तर महावितरण कंपनीकडून केबल चालकांवरती कारवाई का केली जात नाही?
प्रत्येक दिवाळीला महावितरणच्या काही अधिकाऱ्यांना दिवाळी पाकीट म्हणून लाखो रुपयांचे गिफ्ट दिलं जात आहे? त्यामुळेच केबल चालकांवरती कोणतीही कारवाई होत नाही अशी चर्चा स्थानिकांमधून होत आहे. जर खरंच महावितरणच्या अधिकाऱ्यांना कोणतेही लाच दिली जात नसेल तर महावितरणचे अधिकारी परिसरातील सर्व केबल वायर विद्युत पोलवरून काढून टाकण्याचे आदेश संबंधितांना देणार का?
कि येणाऱ्या दिवाळीत लाखो रुपयाची लाच घेणार? माहिती अधिकार कायद्याअंतर्गत सर्व माहिती घेऊन लवकरच जनतेसमोर ठेवणार.