• Home
  • माझा जिल्हा
  • सोमेश्वर कारखान्यावर शनिवार दि ३/२/२०२४ रोजी सकाळी ११ वा. संचालक मंडळाने अग्रक्रमाने सभासदांच्या उस तोडीस प्राधान्य दिल्याने संचालक मंडळास व MD यांना नारळ देणार :- श्री सतिशयव काकडे
Image

सोमेश्वर कारखान्यावर शनिवार दि ३/२/२०२४ रोजी सकाळी ११ वा. संचालक मंडळाने अग्रक्रमाने सभासदांच्या उस तोडीस प्राधान्य दिल्याने संचालक मंडळास व MD यांना नारळ देणार :- श्री सतिशयव काकडे

प्रतिनिधी

उस तोडीचे चोख नियोजन करून सभासदांची कपडे काढल्या बद्दल जाब विचारण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे शेतकरी कृती समितीचे आवाहन…

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा सन २०२३-२४ चा गाळप हंगाम सुरू होवुन कारखान्याने ९० दिवसांमध्ये जवळपास ८ लाख १७ हजार मे.टन गाळप पुर्ण केलेले आहे. त्यापैकी कारखान्याने १ लाख ९० हजार मे.टन एवढा गेटकेन उस गाळपास आणल्याचे समजते त्यापैकी सभासदांचा फक्त ६ लाख २७ हजार मे.टन उसाचे गाळप केलेले आहे. कारखान्याने गेटकेन उस तात्काळ बंद करून कारखान्याच्या परिपत्रकानुसार सभासदांची उस तोड व्हावी. यासाठी कृती समितीने समक्ष भेटुन निवेदन देवुन जाब विचारला होता. तरीही कारखान्याने गेटकेन उस अद्यापपर्यंत बंद केलेला नाही. तरी दि.१/२/२०२४ रोजी देखील कारखान्यास याबाबत निवेदन दिलेले आहे.

गेल्या वर्षी सोमेश्वर कारखान्याने १२ लाख ५६ हजार मे.टन गाळप केले होते. चालु वर्षी प्रचंड दुष्काळी परिस्थिती आहे. असे असतानाही सोमेश्वर कारखान्याने आज अखेर सुमारे ८ लाख १७ हजार मे.टन गाळप केले असुन सभासदांचा हक्काचा ६ ते ७ लाख मे.टन उस शिल्लक आहे. म्हणजेच या वर्षी सुमारे १३ ते १४ लाख मे. टनांच्या आसपास गाळप होणार आहे. म्हणजेच मागील वर्षापेक्षा सुमारे दोन लाख मे.टन गाळप जादा होणार आहे. यामध्ये गेटकेन धारकांचा कमी रिकव्हरीचा उस गाळप करून त्यांना सभासदांच्या एवढा भाव देवुन चेअरमन यांना कोणाचे हित साधायचे आहे. वास्तविक गेटकेन उसाचे गाळप करून सभासदांच्या उसाची वेळेत उस तोड न झाल्याने टनेज प्रती एकरी ८ ते १० मे.टन कमी झालेले आहे. तसेच उस तोड विलंबाने झाल्याने दुबार पिक सुध्दा बुडलेले आहे असे दुहेरी नुकसान चेअरमन यांनी सभासदांचे का केले? याचा जाब विचारण्यासाठी सर्व सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.

संचालक मंडळाने आजपर्यंत उस तोडीचे नियोजन हे परिपत्रकाप्रमाणे केलेले आहे, या वर्षी परिपत्रकाची अंमलबजावणी करण्याचे काम कार्यकारी संचालक यांचे होते. यामध्ये त्यांनी दुर्लक्ष केल्याने त्यांनी सभासदांचे आर्थिक नुकसान केलेले आहे. त्यामुळे त्यांना प्रथम तमाम उस उत्पादक शेतकऱ्यांच्याकडुन नारळ देण्याचा कार्यकम होणार आहे. तरी चेअरमन व संचालक मंडळास जाब विचारण्यासाठी शेतकरी कृती समिती व तमाम उस उत्पादक सभासद शनिवार दि. ३/२/२०२४ रोजी सकाळी ११.०० ते १२.०० दरम्यान कारखाना कार्यस्थळावर आपली भेट घेण्यासाठी येणार असुन आपली वेळ राखीव ठेवावी. चालु वर्षी दुष्काळामुळे संपुर्ण महाराष्ट्रातील कारखान्यांचे गाळप कमी होणार आहे. सोमेश्वर कारखान्याचे मागील वर्षी १२ लाख ५६ हजार मे.टन गाळप झाले होते. परंतु यावर्षी सोमेश्वरचे गाळप १४ लाख मे. टनाच्या आसपास होईल असे दिसते म्हणजेच दुष्काळ असुनही एक ते दिड लाख मे.टन गाळप जादा होणार आहे. म्हणुन कृती समिती व सभासदांच्या वतीने चेअरमन व संचालक मंडळ यांचाही नारळ देवुन सभासदांची कपडे फेडल्याबद्दल सत्कार व जाब विचारला जाणार आहे. तरी सभासदांनो घरी बसुन किंवा मला फोन करून तुम्हाला न्याय मिळणार नाही

वास्तविक माझा वैयक्तिक १५/६ चा ८६०३२ उस बहुतांश गाळप झालेला आहे. शेतकरी कृती समितीच्या वतीने तमाम उस उत्पादक सभासदांच्या न्याय हक्कांसाठी शनिवार दि.३/२/२०२४ रोजी जाब विचारण्यासाठी मोठ्या संख्येने सभासद उपस्थित राहिले नाहीत, तर सभासदांचेच नुकसान होणार आहे. सभासद बहुसंख्येने उपस्थित न राहिल्यास भविष्यात शेतकरी कृती समितीस नाईलाजास्तव वेगळा निर्णय घ्यावा लागेल याची नोंद सभासदांनी घ्यावी. विद्यमान संचालक मंडळ हे गेटकेन धार्जिन आहे.

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026