• Home
  • क्राईम
  • सराफ दुकानात गोळीबार, चोरीचा प्रयत्न करणारा जेरबंद
Image

सराफ दुकानात गोळीबार, चोरीचा प्रयत्न करणारा जेरबंद

प्रतिनिधी

शिरूर शहराच्या मध्यवस्तीतील सुभाष चौक येथे सराफ दुकानात घुसून गोळीबार आणि चोरीचा प्रयत्न करणाऱ्यास ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. त्याच्याकडून तीन गावठी पिस्तूल आणि दोन काडतूस असा सव्वालाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. शरद बन्सी मल्लाव (वय २४, रा. काची आळी, शिरूर, ता. शिरूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. सुभाष चौक येथील माजी नगराध्यक्ष अशोक कुलथे यांच्या अशोक जगन्नाथ कुलथे सराफ या दुकानात २८ जानेवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी चोरीचा प्रयत्न केला. यावेळी चोरट्यांशी प्रतिकार करताना दुकानातील कर्मचारी भिका एकनाथ पंडीत हे जखमी झाले. गोळीबार करून चोरटे मोटारसायकलवरुन पसार झाले होते.

गोळीबाराचा आवाजाने परिसरात घबराट आणि मोठी खळबळ उडाली होती.पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. तपास पथकाने सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असता संशयित आरोपींमध्ये सराईत गुन्हेगाराच्या वर्णनाचा इसम असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. गोपनीय माहितीचे आधारे सदरचा हा गुन्हा शरद बन्सी मल्लाव याने त्याचा साथीदार सागर ऊर्फ बबलु दत्तात्रय सोनलकर (रा. धायरी पुणे) याच्या मदतीने केला असल्याचे समजले. आरोपी हे सिंहगड किल्ल्याचे जंगलात लपून बसले असल्याची माहिती मिळाली. तपास पथकाने सिंहगड किल्ला परिसरातील जंगलातून शरद बन्सी मल्लाव याला जेरबंद केले. त्याचा साथीदार सागर ऊर्फ बबलू दत्तात्रय सोनलकर हा जखमी असून तो ससून रुग्णालय येथे उपचार घेत आहे. शरद मल्लाव याच्यावर सात गुन्हे दाखल असून त्याला पुणे आणि नगर जिल्हयातील पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. तसेच आरोपी सागर ऊर्फ बबलु सोनलकर याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत.

Releated Posts

दोन गावठी पिस्तूल, एक रायफलसह आरोपी जेरबंद; माळेगाव पोलिसांची धडक कारवाई

प्रतिनिधी माळेगाव पोलिसांनी अवैध शस्त्रास्त्रांविरोधात कारवाई करत दोन गावठी पिस्तूल, एक रायफल, दोन जिवंत काडतुसे तसेच दोन काडतुसांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

रागाच्या भरात नातवाने आजोबांचा लोखंडी गजाने केला खून; आरोपी नातू पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी   शिरूर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक येथे शेतातील व घरातील कामे सांगितल्याच्या रागातून २६ वर्षीय नातवाने ८४ वर्षीय…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

बारामतीत म्हशींच्या 12 रेडकांची क्रूर वाहतूक उघड; पिकअपसह चालकावर गुन्हा दाखल

सहसंपादक- अक्षय थोरात बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी परिसरात म्हशींच्या रेडकांची कथितपणे क्रूर व बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी माळेगाव पोलिसांनी एका…

ByBymnewsmarathi Jun 14, 2026

ऑनलाईन गेमिंगच्या आमिषाने लाखोंची फसवणूक; पुणे पोलिसांनी मोठ्या सायबर रॅकेटचा पर्दाफाश

प्रतिनिधी ऑनलाईन गेम खेळून अल्पावधीत मोठी कमाई करून देण्याचे आमिष दाखवत नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या मोठ्या सायबर…

ByBymnewsmarathi Jun 13, 2026