• Home
  • क्राईम
  • पुण्यातील तरुणाचा अनैतिक संबंधातून गुवाहाटीत खून, महिलेसह दोघांना अटक
Image

पुण्यातील तरुणाचा अनैतिक संबंधातून गुवाहाटीत खून, महिलेसह दोघांना अटक

प्रतिनिधी

पुण्यातील तरुणाचा आसाममधील गुवाहाटी शहरात खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिलेसह दोघांना अटक केली आहे. अनैतिक संबंधातून खून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. संदीप सुरेश कांबळे (वय ४४, रा. येरवडा) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अंजली शाॅ, विकासकुमार शाॅ यांना अटक करण्यात आली आहे. संदीप याचा गुवाहाटी शहरातील तारांकित हाॅटेलमध्ये सोमवारी (५ फेब्रुवारी) मृतदेह सापडला. याप्रकरणाचा तपास गुवाहाटी पोलिसांकडून करण्यात आला.

तपासात पश्चिम बंगालमधील महिलेसह तिच्या साथीदाराने कांबळे याचा खून केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने अंजली आणि तिचा साथीदार विकासकुमार यांना अटक केली. आरोपी अंजलीची संदीप याच्याशी कोलकात्ता येथील विमानतळावर ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. अंजली त्याला पुण्यात भेटण्यासाठी नेहमी यायची. संदीप कोलकात्ता येथे तिला भेटण्यासाठी जायचा त्यांनी तिला विवाहाबाबत विचारणा केली होती. संदीपला तेरा वर्षांची मुलगी आहे.

अंजलीने विवाहास नकार दिल्यानंतर तो चिडला. त्याने अंजलीच्या नातेवाईकांना छाायाचित्रे पाठविली. त्यामुळे अंजलीच्या कुटुंबीयानी तिला जाब विचारला. या प्रकाराची माहिती तिने मित्र विकासकुमारला दिली. विवाहासाठी संदीप तिच्यावर दबाब आणत होता. तिला त्रास देत होता. त्यामुळे तिने मित्राची मदत घेऊन संदीपचा खून करण्याचा कट रचला. तिने संदीपला गुवाहाटीत भेटायला बोलावले. संदीपने तारांकित हाॅटेलमध्ये खोली घेतली. अंजलीने तिचा मित्र विकासकुमारसाठी तारांकित हाॅटेलमध्ये एक खोली आरक्षित केली. संदीप गुवाहाटीत पोहोचल्यानंतर अंजली त्याला भेटली. तेव्हा तिने छायाचित्रे प्रसारित का केली, अशी विचारणा केली. छायाचित्रे समाजमाध्यमातून हटवण्याची मागणी तिने केली. तेव्हा त्याने नकार दिला. त्यानंतर तिने मिठाईतून त्याला गुंगीचे ओैषध दिले. त्यानंतर तेथे विकास आला.

विकासने त्याला मारहाण केली. जखमी अवस्थेतील संदीपला हाॅटेलमधील खोलीत सोडून अंजलीआणि विकास पसार झाले. संदीप बेशुद्धावस्थेत पडला होता. त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. हाॅटेलमधील कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. कोलकात्याला पसार होण्याच्या तयारीत असलेल्या अंजली आणि तिचा साथीदार विकासला गुवाहाटीतील कामाख्या रेल्वे स्थानकाच्या आवारात पकडले.

Releated Posts

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय सोनवणे…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026