मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

बारामती ! वडगाव निंबाळकर मध्ये गणेश जयंती उत्साहात साजरी

mnewsmarathi 14 Feb 2024 1 मिनिट वाचन 9,069 वाचन

प्रतिनिधी – फिरोज भालदार

वडगाव निंबाळकर ( पांढरी ) येथे श्री इच्छापूर्ती गणेश मंदिरामध्ये इच्छापूर्ती गणेश उत्सव कमिटी यांच्यावतीने गणेश जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये श्री गणेश यांचा महाअभिषेक सोहळा सकाळी पहाटे ५ वाजता पार पडला. सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत एकतारी भजनाचे आयोजन करण्यात आले होते व १२.०५ मिनिटानी श्रींचा जन्म सोहळा पार पाडण्यात आला .

 गणेश जयंती निमित्त इच्छापूर्ती गणेश उत्सव कमिटी यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महप्रसादाचा आनंद सर्व गणेश भक्तांनी घेतला. यावेळी वडगाव निंबाळकर श्री गणेश भक्तांनी या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन भक्तिमय वातावरणात गणेश जयंती साजरी करण्यात आली .

गणेश जयंती निमित्त इच्छापूर्ती गणेश उत्सव कमिटीच्या वतीने या आयोजित कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम अप्रतिम रित्या पार पडला असे कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेले व दर्शनासाठी आलेल्या श्री गणेश भक्तांकडून संबोधले गेले.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi