• Home
  • माझा जिल्हा
  • साहित्य सम्राटला क्रांतीगुरू लहुजी वस्ताद राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त
Image

साहित्य सम्राटला क्रांतीगुरू लहुजी वस्ताद राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त

प्रतिनिधी

मातंग साहित्य परिषदे तर्फे मातंगऋषी दुसरे साहित्य संमेलन, राजवाडा लॉन्स पिंपरी चिंचवड पुणे येथे आयोजित करण्यात आले होते. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद्मश्री गिरीशजी प्रभुणे, स्वागताध्यक्ष शंकरशेठ जगताप, आमदार सुनिल कांबळे, परिषदेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय भिसे आदी मान्यवरांच्या हस्ते साहित्य सम्राट पुणे बहुउद्देशिय संस्थेस क्रांतीगुरू लहुजी साळवे वस्ताद उत्कृष्ट राज्यस्तरीय संस्था पुरस्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोदजी अष्टुळ यांना प्रदान करण्यात आला. यावेळी पुरस्कार स्विकारताना संस्थेचे मार्गदर्शक म.भा. चव्हाण, प्रा.अशोक शिंदे, विजय वडवेराव, प्रिया दामले, अनिल नाटेकर आणि इतर नामवंत साहित्यिक उपस्थित होते.

मातंगीदेवी/ शबरी काव्य कट्ट्यावर राज्यातील अनेक सुप्रसिद्ध कवी कवयित्रींनी आपल्या काव्य रचना सादर केल्या. यावेळी विनोद अष्टुळ यांनी साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे लिखित फकिरा या कांदबरीतील जोगणी या शुर प्रथेचा इतिहास सांगणारी गेय कविता सादर करून रसिकांची मने जिंकली.

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026