• Home
  • माझा जिल्हा
  • श्री वाघेश्वर विद्यालय निरावागज या विद्यालयातील सन 2005 बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन संपन्न
Image

श्री वाघेश्वर विद्यालय निरावागज या विद्यालयातील सन 2005 बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन संपन्न

प्रतिनिधी

बारामती तालुक्यामधील निरावागज या गावातील श्री वाघेश्वर विद्यालय निरावागज या विद्यालयामधील सन 2005 सालाच्या विद्यार्थ्यांची खूप दिवसानंतर स्नेहसंमेलन सोहळा अति उत्साहात साजरा झाला यामध्ये आयोजक व नियोजक यांनी अति उत्तम प्रमाणे नियोजन करून लहानपण देगा देवा या म्हणीचे एक छोट्या स्वरूपामध्ये माजी विद्यार्थ्यांना आपले बालपण जगण्याचे व आपल्या बालपणीचे मित्रांबरोबर काहीसा वेळ घालवण्यासाठी खूप उत्तम पद्धतीने नियोजन केले

 या सोहळ्यामध्ये खूप दिवसानंतर आपले बालपणीचे मित्र एकमेकांना भेटले व यामध्ये आपल्या आयुष्यामधील चढ-उतार एकमेकांना सांगून आपले मन हलके करून आपले पुढील आयुष्य जगण्यासाठी हे अविस्मरणीय क्षण आपल्या मनामध्ये जोपासून खूप जोमाने आपले आयुष्य जगतील कारण जुन्या आठवणी हे उत्साहातील अति नाजूक दोरा म्हणून ओळखला जातो आणि हा नाजूक दोरा टिकवून ठेवणे हे या विद्यार्थ्यांनी अतिशय महत्त्वाचे उदाहरण देऊन सांगितले आहे.

लहानपणीचे मित्र हे आपल्या जिवाभावासारखे असतात आपले लहानपण हे कसे गेले यांच्याबरोबर राहून कधी कळलेच नाही आयुष्य हे एवढे खडतर आहे हे यांच्याबरोबर कधी कळलेच नाही खडतर आयुष्य हे आपल्या लहानपणीच्या मित्रांबरोबर अतिशय सुखमयप्रमाणे जाते हे आज या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले

बालपणीच्या मित्रांवरती खूप सारे लिहिता येते बोलता येते परंतु लिहिता आणि बोलताना जुन्या आठवणी येतात परंतु आपले आयुष्यातील हे क्षण कधी परत येणार नाहीत हे लक्षात येताच मन भारावून जाते.

श्री वाघेश्वर विद्यालय निरावागज सन 2005 सालच्या विद्यार्थ्यांना आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026