• Home
  • माझा जिल्हा
  • अमरावती-यवतमाळ मार्गावर भीषण अपघातात चार ठार, १० जखमी
Image

अमरावती-यवतमाळ मार्गावर भीषण अपघातात चार ठार, १० जखमी

प्रतिनिधी

यवतमाळ मार्गावर नांदगाव खंडेश्‍वर नजीक शिंगणापूर येथे सिमेंट कॉंक्रिट मिक्‍सर ट्रकने टेम्‍पो ट्रॅव्‍हलरला धडक दिल्‍याने झालेल्‍या भीषण अपघातात चार तरूणांचा जागीच मृत्‍यू झाला, तर १० जण गंभीररीत्‍या जखमी झाले. हा अपघात रविवारी सकाळी घडला. जखमींवर येथील जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय आणि खासगी रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व तरूण अमरावतीहून यवतमाळ येथे एका क्रिकेट स्‍पर्धेत सहभागी होण्‍यासाठी जात होते.

श्रीहरी राऊत, आयुष बहाळे, सुयश अंबर्ते, संदेश पाडर अशी मृत तरूणांची नावे आहेत. येथील रुक्मिणी नगर आणि रवी नगर परिसरात राहणारे १४ ते १५ तरूण यवतमाळ येथे आयोजित क्रिकेट सामन्‍यासाठी टेम्‍पो ट्रॅव्‍हलरने जात होते. सकाळी नऊ वाजताच्‍या सुमारास शिंगणापूर फाट्यानजीक एका भरधाव सिमेंट कॉंक्रिट मिक्‍सर ट्रकने टेम्‍पो ट्रॅव्हलरला धडक दिली. अपघातात चार तरूणांना जागीच मृत्‍यू झाला, तर १० जण जखमी झाले.

जखमींना नांदगाव खंडेश्‍वर येथील रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले. त्‍यातील पाच गंभीर जखमींना अमरावती येथील रुग्‍णालयात हलविण्‍यात आले.

Releated Posts

बारामतीत बाहेरच्या आमदारांची प्रचारासाठी खरंच गरज आहे का?”

प्रतिनिधी बारामती तालुक्यात सध्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. विविध पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू असून, अनेक…

ByBymnewsmarathi Apr 19, 2026

सातारा जिल्हा परिषद निवडणूक गोंधळ : पोलीस अधीक्षकांवरील निलंबन कारवाईचा आदेश, पुढे काय?

प्रतिनिधी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.…

ByBymnewsmarathi Mar 23, 2026

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026