इंस्टाग्रामवर ओळखी झाली, मग प्रेम झालं… दहावीच्या विद्यार्थिनीसोबत नंतर काय घडलं?

क्राईम

प्रतिनिधी

इंस्टाग्रामवरून एका युवकाशी ओळख झाल्यानंतर दहावीतील मुलीचे सूत जुळले. घरात कुणी नसताना त्यांनी अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती मुलगी चार महिन्यांची गर्भवती झाली. मुलीचे पोटाचा आकार वाढल्याने आईच्या लक्षात प्रकार आला. तिने मित्राचे नाव सांगितल्यानंतर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. शिवम शेषराम मेहरा (१९,एकतानगर, भांडेभाडी) असे आरोपीचे नाव आहे.

पीडित मुलगी दहाव्या वर्गाची विद्यार्थीनी असून ती नंदनवनमध्ये राहते. तिची ऑगस्ट २०२३ मध्ये इंस्टाग्रामवरून शिवम मेहरा याच्याशी ओळख झाली. दोघांनी एकमेकांना संपर्क क्रमांक घेतला. एकमेकांशी मैत्री झाली नंतर दोघेही प्रेमात पडले. शिवमने तिला अनेकदा घरी नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती गर्भवती झाली.

चार महिन्यांची गर्भवती झाल्यानंतर तिच्या आईला मुलीच्या पोटाचा आकारामुळे संशय आला. तिची विचारपूस केली असता तिने शिवमचे नाव सांगितले. आईने तिला घेऊन पारडी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करीत अटक केली.