मुख्य मजकुरावर जा
Friday, 18 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 19 February 2024 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

लाच प्रकरणात पिंपरीतील सहायक पोलीस आयुक्त अडचणीत, गुन्हा दाखल न करण्यासाठी पाच लाखांची मागणी

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
February 19, 2024 1 मिनिट वाचन 3,504 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी

फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहायक आयुक्त मुगुटलाल पाटील यांच्या सांगण्यावरून एक लाखांची लाच घेणाऱ्या मध्यस्थाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडल्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. मुगुटलाल पाटील यांची याप्रकरणात एसीबीकडून चौकशी करण्यात येणार आहे.

ओंकार भरत जाधव (वय ३१, रा. वास्तुव्हिवा सोसायटी, वाकड, मूळ रा. अकोले, जि. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. ओंकार जाधव मोटारचालक आहे. जाधव आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील देहूरोड विभागाचे सहायक पोलिस आयुक्त मुगुटलाल पाटील यांची पूर्वीपासून ओळख होती. तक्रारदार तरुणाविरुद्ध सहायक पोलिस आयुक्त मुगुटलाल पाटील यांच्याकडे तक्रार अर्ज आला होता. कात्रज-कोंढवा बाह्यवळण मार्गावरील जागेसंदर्भात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, असे तक्रार अर्जात म्हटले होते. संबंधित तक्रार अर्जाची चौकशी पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली होती.

तक्रार अर्जानुसार तक्रारदार तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल न करणे, तसेच त्याला गुन्ह्यात मदत करण्यासाठी पाच लाखांच्या लाचेची मागणी मुगुटलाल पाटील यांच्या सूचनेवरून ओंकार जाधव याने केल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती. त्यानुसार एसीबीने तक्रारीची पडताळणी केली. बंडगार्डन रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयाच्या आवारात लाचेचा पहिला हप्ता स्विकारणाऱ्या जाधवला सापळा लावून पकडण्यात आले. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख