मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
क्राईम

मित्राची हत्या करून आरोपीचीही आत्महत्या

mnewsmarathi 21 Feb 2024 1 मिनिट वाचन 8,643 वाचन

प्रतिनिधी

कुर्ला काजुपाडा परिसरात गाळ्यामध्ये राहणाऱ्या दोन मित्रांमध्ये झालेल्या वादातून एकाने दुसऱ्याची हत्या करून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपासाला सुरूवात केली आहे.

काजुपाडा परिसरातील घास कंपाऊंड येथील एका कपड्यांच्या गाळ्यामध्ये ही घटना घडली. आरोपी व मृत व्यक्ती दोघेही या गाळ्यामध्ये काम करतात. त्यांच्यात झालेल्या वादातून एकाने दुसऱ्याचा कैचीने गळा कापला. त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच साकीनाका पोलिस घटनास्थळी पोहोचले. उभयतांमधील भांडणातून हा प्रकार घडल्याचे सूत्रांनी सांगितले.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi