• Home
  • क्राईम
  • लहान मुले मोबाईल चोरी करायचे अन म्होरक्याला नेऊन द्यायचे…
Image

लहान मुले मोबाईल चोरी करायचे अन म्होरक्याला नेऊन द्यायचे…

प्रतिनिधी

गजबजलेल्या परिसरात आणि बाजारात येणाऱ्यांचे मोबाईल चोरी करायचे आणि म्होरक्याला नेऊन द्यायचे, असा प्रकार काही लहान मुले करीत होते. लहान मुलांनी चोरलेल्या मोबाईलची स्वस्तात विक्री करून पैसे कमविण्याचा धंदा एकाने सुरु केला होता. मात्र, तो सदर पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याकडून ३३ मोबाईल फोन आणि चोरीचे वाहन जप्त करण्यात आले आहे. शेख रियाज शेख मुजाहिद (२३) रा. मोतिझरना, साहेबगंज, झारखंड असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गत काही दिवसांपासून मंगळवारी बाजार परिसरात मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी चोरांना पकडण्यासाठी सापळा रचला. मंगळवारी बाजार असल्याने पोलीस परिसरात सक्रीय होते. या दरम्यान पोलिसांना रियाज संशयास्पदरित्या मोटारसायकलने जाताना दिसला. त्याच्याजवळ एक लाल रंगाची बॅग होती. पोलिसांना पाहताच त्याने पळ काढला. पाठलाग करून गोवा कॉलनीजवळ त्याला पकडण्यात आले. बॅगच्या झडतीत विविध कंपन्यांचे ३३ मोबाईल फोन मिळाले. मोबाईल आणि त्याच्याजवळ मिळालेल्या मोटारसायकल क्र. एमएच-३१/सीडी-६२९५ चे कागदपत्र मागितले असता तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. ठाण्यात आणून रेकॉर्ड काढला असता मोटारसायकल बैरामजी टाऊन परिसरातून चोरी झाल्याचे समजले.

रियाजने यशोधरानगरच्या गुलशननगर परिसरात एक खोली भाड्याने घेतली होती. तेथे त्याच्यासोबत काही मुलेही राहात होती. पोलिसांनी खोलीवर धाड टाकली, मात्र एकही मुलगा मिळाला नाही. पोलिसांना संशय आहे की, रियाजसोबत इतर आरोपीही परिसरात सक्रीय होते. तो सापडल्याची माहिती मिळताच सर्व भूमिगत झाले. चौकशीत रियाजने सांगितले की, तो झारखंड येथून मुलांची टोळी घेऊन वेगवेगळ्या शहरांमध्ये जातो. आठवडी बाजारात मुले लोकांना घेरून धक्काबुक्की करतात आणि मोबाईल लंपास करून पसार होतात. एका शहरातून ७० ते ८० मोबाईल गोळा झाल्यानंतर आरोपी परत झारखंडला फरार होत होतो.

Releated Posts

दोन गावठी पिस्तूल, एक रायफलसह आरोपी जेरबंद; माळेगाव पोलिसांची धडक कारवाई

प्रतिनिधी माळेगाव पोलिसांनी अवैध शस्त्रास्त्रांविरोधात कारवाई करत दोन गावठी पिस्तूल, एक रायफल, दोन जिवंत काडतुसे तसेच दोन काडतुसांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

रागाच्या भरात नातवाने आजोबांचा लोखंडी गजाने केला खून; आरोपी नातू पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी   शिरूर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक येथे शेतातील व घरातील कामे सांगितल्याच्या रागातून २६ वर्षीय नातवाने ८४ वर्षीय…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

बारामतीत म्हशींच्या 12 रेडकांची क्रूर वाहतूक उघड; पिकअपसह चालकावर गुन्हा दाखल

सहसंपादक- अक्षय थोरात बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी परिसरात म्हशींच्या रेडकांची कथितपणे क्रूर व बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी माळेगाव पोलिसांनी एका…

ByBymnewsmarathi Jun 14, 2026

ऑनलाईन गेमिंगच्या आमिषाने लाखोंची फसवणूक; पुणे पोलिसांनी मोठ्या सायबर रॅकेटचा पर्दाफाश

प्रतिनिधी ऑनलाईन गेम खेळून अल्पावधीत मोठी कमाई करून देण्याचे आमिष दाखवत नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या मोठ्या सायबर…

ByBymnewsmarathi Jun 13, 2026