मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
क्राईम

भाईंदर मध्ये पोलीस पथकावर हल्ला, महिला पोलिसाला बांबूने बेदम मारहाण

mnewsmarathi 22 Feb 2024 1 मिनिट वाचन 9,931 वाचन

प्रतिनिधी

अमली पदार्थ विरोधी कारवाई करण्यासाठी गेलेल्या एका पोलीस पथकावर नशेबाजांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात एका महिला पोलिसाला लाकडी बांबूने बेदम मारहाण करण्यात आली आहे, महिला पोलीस गंभीर जखमी झाली आहे. भाईंदर येथील धारावी परिसरात ही घटना घडली.

मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातर्फे सध्या अमली पदार्थ विरोधात कारवाई करण्यात येत आहे. दररोज नशेबाजांची धरपकड करून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. अमली पदार्थ विरोधी शाखेचे पाच जणांचे पथक रात्री ९ च्या सुमारास भाईंदर पश्चिम येथील उत्तन परिसरातील धावगी डोंगर येथे गेले होते. त्यावेळी १५ ते २० जणांनी पोलिसांशी वाद घालून मारहाण केली. यामुळे पोलिसांना जीव वाचवून माघारी फिरावं लागलं होतं. यावेळी काही नशेबाजांनी महिला पोलीस हवालदार लता एकलदेवी यांना बांबूने बेदम मारहाण केली. पोलिसांकडे शस्त्र नसल्याने त्यांना प्रतिकार करता आला नाही.या हल्ल्यात महिला पोलीस कर्मचारी लता या गंभीर जखमी झाल्या आहेत.

या प्रकरणी उत्तन सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रात्री उशिरा अब्बास अली मिर्झा ( ३८) आणि अंकुर भारती (२८) आणि राजू गौतम (१९) या तीन हल्लेखोर आरोपींना अटक केली आहे.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi