• Home
  • क्राईम
  • ठाण्यातील बांधकाम विकासक कौस्तुभ कळके यांना अटक
Image

ठाण्यातील बांधकाम विकासक कौस्तुभ कळके यांना अटक

प्रतिनिधी

ठाण्यातील बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्ध मे.जोशी एंटरप्रायझेस कंपनीतून दोन भागीदारांना बाहेर काढण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून ती बँक आणि कंपनी नोंदणी कार्यालयात सादर करून फसवणुक केल्याचा आरोप बांधकाम व्यावसायिक कौस्तुभ कळके यांच्यावर असून या प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात नौपाडा पोलिसांनी कळ‌के यांना शुक्रवारी अटक केली आहे. या प्रकरणातील दोन जण फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

ठाण्यातील बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्ध मे. जोशी एंटरप्रायझेस कंपनीचे भागीदार सुनिल गंगाधर लिमये यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल झाला आहे. मे. जोशी एंटरप्रायझेस ही कंपनी कौस्तुभ कळके यांनी सुरू केली होती. या कंपनीत २१ जुलै २०२२ मध्ये सुनिल लिमये आणि जयंतीलाल जैन हे दोघे भागीदार झाले. या कंपनीचे जुन्या ठाण्यात म्हणजेच नौपाडा, तीन हात नाका, चरई आणि पाचपखाडी भागात बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. या कंपनीतील भागीदारांमध्ये वाद झाले असून हा वाद आता पोलिस ठाण्यात पोहचला आहे.

कौस्तुभ यांनी कामिशा दानबहाद्दुर सिंह आणि सुंदरराज हेगडे यांनी आपसात संगनमत करून सुनील आणि जयंतीलाल यांना कंपनीतून बाहेर काढण्यासाठी निवृत्ती करारावर त्यांच्या खोट्या स्वाक्षरी केल्या आणि ही कागदपत्रे बँक आणि कंपनी नोंदणी कार्यालयात सादर करून फसवणुक केली. असा आरोप सुनील लिमये यांनी नौपाडा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केला असून त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून कौस्तुभ यांना शुक्रवारी अटक केली आहे. ठाणे न्यायालयाने त्यांना ६ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. कामिशा सिंह आणि सुंदरराज हेगडे या दोघे फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Releated Posts

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय सोनवणे…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026